नोटावर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यास कधी पासून सुरवात झाली ?

भारतीय रिजर्व बँकला १ रुपयाची नोट सोडून बाकी सर्व नोट छापण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना आरबीआई अधिनियम, 1934 नुसार दिलेला आहे. याच अधिनियमातील सेक्शन 24(1) नुसार बँकेस १ रुपयाची नोट छापण्याचा अधिकार नाही आहे.

मुद्रा अध्यादेश, 1940, (Currency Ordinance, 1940) च्या नियमानुसार १ रुपयाची नोट भारत सरकार आणि २ रुपये ते २००० पर्यंतची नोट रिजर्व बँक ऑफ इंडिया द्वारे छापल्या जातात. रिजर्व बँक १० हजार रुपया पर्यंतची नोट छापू शकते.

भारतात १ रुपयाची नोट अर्थ मंत्रालय कडून छपाई करण्यात येते यावर आरबीआय गवर्नरची सही नसून वित्त सचिवाची सही असते. भारत स्वतंत्र झाल्यावर २ वर्ष ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम यांचा फोटो असलेल्या नोटा चलनात होत्या. यावेळेस रुपयाची गणना १६ आण्यासोबत केली जात असे.

१९५७ पासून दशमान पद्धती नुसार नवीन पद्धत आणण्यात आली यामध्ये १ रुपया हा १०० पैश्यामध्ये बदलविण्यात आला. १९४९ मध्ये राजाचा फोटो काढून त्या जागेवर अशोक स्तंभ लावण्यात आला. आता बघूया गांधीजीचा फोटो छापण्यास कधी पासून सुरवात झाली.

माहिती अधिकारात मागवलेल्या माहिती नुसार १३ जुलै १९९३ ला रिजर्व बँक ऑफ इडिया ने केंद्र सरकारला एक बाजूने गांधीजीचा फोटो छापायची मागणी केली होती. आणि आरबीआय ने १९९६ ला चलनावर गांधीजीचा फोटो छापण्यास सुरवात केली. अशोक स्तंभ लहान करून एका बाजूने घेण्यात आले आणि त्या जागेवर महात्मा गांधी यांचा फोटो लावण्यात आला.

याच माहिती अधिकारात उघड झालेल्या माहिती मध्ये सरकारने हा निर्णय नक्की कधी घेतला आणि कधी पासून याची अमलबजावणी झाली या संबंधी माहिती नाही आहे. नोटवर असलेला गांधीजीचा फोटो बनविला नसून तो ओरीजनल फोटो आहे. हा फोटो कलकत्ता येथील व्हाईसराय हाउस येथे काढण्यात आला होता.

१९४६च्या आसपास ब्रिटीश सेक्रेटरी फ्रेडरिक पेथिक लॉरेंस यांच्या भेटीला गेले असताना हा फोटो काढण्यात आला होता. आता हा फोटो भारताच्या चलनाचा ट्रेडमार्क झाला आहे.

आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.