सध्या गणेशोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. २ दिवसात विसर्जन होऊन लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येईल. गणपतीबद्दल अनेक गोष्टी रूढी परंपरा पाळल्या जातात. गणपतीला मोदकाचा विशेष नैवद्य असतो. याशिवाय अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात.
गणपती जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा तुम्ही बघितले असेल कि सहसा त्याचा चेहरा झाकून आपण घेऊन येतो. यामागे काय कारण आहे याबद्दल कधी विचार केला आहे का? हि प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली असून याबद्दल आज खासरेवर जाणून घेऊया.
तसं बघायला गेलं तर गणपती घरी आणताना चेहरा झाकावंच असे बंधनकारक नसल्याचे काही पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. हि प्रथा आपोआप पडलेली असून यामागे काही शास्त्रीय कारण नाहीये. काही ठिकाणी हि प्रथा पाळली जाते तर काही ठिकाणी नाही.
मूर्ती घरी नेताना कोणताही वाईट भावनेने तिच्याकडे बघू नये हा त्यामागचा उद्देश असतो. घरी नेताना रस्त्यात एखाद्याची वाईट भावना तिच्यावर पडू शकते. त्यामुळे मूर्ती झाकून नेली जाते.
मूर्ती घरी आणताना डोक्यावर टोपी असणे बंधनकारक असते. या गोष्टीला संस्कृतीचा भाग म्हणून पाहिले जाते. गणपती आपल्याकडे पाहुणा येतो. आणि भारतीय संस्कृतीत पाहुण्यांचे स्वागत टोपी घालून करण्याची परंपरा आहे. त्यामुळे गणपती आणायला गेल्यावर देखील टोपी घालून जायला हवे.
का केले जाते गणेश विसर्जन ?
धार्मिक ग्रंथांनुसार वेद व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग १० दिवस श्रीगणेशाला महाभारत कथा सांगितली होती. ती कथा श्रीगणेशाने अक्षरशः लिहून काढली. १० दिवसानंतर जेव्हा वेद व्यासांनी आपले डोळे उघडले, तेव्हा त्यांना आढळले की दहा दिवसांच्या अथक परिश्रमामुळे गणेशाचे तापमान खूप वाढले होते. ताबडतोब वेद व्यास गणेशाला जवळच्या तलावात घेऊन गेले आणि त्याला थंड केले. म्हणूनच गणेशाची स्थापना करून चतुर्दशीला गणपतीला पाण्याने थंड केले जाते.
पुढे याच कथेत असेही सांगितले आहे की, गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून वेद व्यासांनी गणपतीच्या शरीराला सुगंधित मातीचा लेप दिला होता. हा लेप सुकल्यानंतर गणपतीचे शरीर ताठ झाले. मातीही गळायला लागली. मग गणपतीला थंड तलावावर नेऊन पाण्यात उतरवण्यात आले.
या दहा दिवसांदरम्यान वेद व्यासांनी गणपतीला आवडते भोजन दिले. तेव्हापासून प्रतिकात्मकरीत्या गणेशाची मूर्ती स्थापन करून दहा दिवस गणपतीला मोदकांचा प्रसाद चढवून दहा दिवसानंतर पाण्यात नेऊन विसर्जन करण्याची प्रथा पडली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.