ज्या कोर्टात वडील चहा विकायचे, त्याच कोर्टात मुलगी जज बनली !

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची शिखरं गाठल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. तसंच आणखी एक उदाहरण पंजाबमध्ये समोर आलं आहे.
कोणी कल्पनाही करू शकणार नाही अश्या प्रकारे हि घटना झाली आहे.
आयुष्यभर ज्या कोर्टात चहा विकून संसार चालवला, त्याच कोर्टात आता मुलगी सर्वोच्च म्हणजेच न्यायाधीशपदी विराजमान झाली आहे.

सुरेंदर कुमार यांनी आपली हयात कोर्टात चहा विक्रेता म्हणून घालवली. प्रांत दंडाधिकारी कार्यालयात ते चहाविक्री करत. याच कोर्टात त्यांनी एक स्वप्न पाहिलं. आपली मुलगीही या कोर्टातच काळा कोर्ट परिधान करुन यावी, असं ते स्वप्न होतं.

सुरेंदर यांच्या मुलीने वडिलांचं स्वप्न स्वत:चं समजलं. इतकंच नाही तर ते स्वप्न तिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सत्यातही उतरवलं.

23 वर्षीय श्रुती पंजाब प्रशासकीय सेवा (कायदा) परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाली. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर श्रुती आता न्यायाधीश म्हणून रुजू होण्यास सज्ज झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे तेच न्यायालय आहे, ज्या न्यायालयात तीचे वडील चहा विकायचे.

“मला कायदा क्षेत्रातच करिअर करायचं होतं. मी न्यायाधीशपदालाच प्राधान्य दिलं. त्यामुळेच तयारी करून मी परीक्षा दिली आणि एससी कॅटेगरीमध्ये पहिला क्रमांक मिळवला” असं श्रुती म्हणते.

गुरु नानक विद्यापीठात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रुतीने पुढील शिक्षण Punjab Law University,पतियाला येथे घेतले. तिच्या भागात ती एकमेव महिला आहे जी या पदापर्यंत पोहचली आहे तीच्या मते आता महिला ह्या स्पर्धा परीक्षेत त्यांचे प्राविण्य मिळवून जगाला दाखवत आहे आम्ही कुठेही कमी न्हाई. तिची रूम पार्टनर हरप्रीत कौर सिधू हि सुध्दा परीक्षा पास झालेली आहे तिचे वडील पोलीस उप निरीक्षक आहे. परंतु तिचा आणि हिच्या संघर्शात आभाळ पाताळ असा फरक आहे.
तिची आजी करमजीत कौर सांगते कि ” तिच्या आजोबाचे स्वप्न होते कि त्याचा मुलगा मोठा अधिकारी व्हायला हवा. परंतु नशिबाने व वेळेने साथ दिली नाही १९८२ साली मुलगा पदवी घेऊन पास झाला व त्याने अभ्यासही सुरु केला होता परंतु सुरेंद्रच्या तब्येतीमुळे त्याला हे शक्य झाले नाहि”
तिच्या यशाचे श्रेय ती तिच्या पालकांना व शिक्षकांना देते त्यांनी वेळोवेळी प्रेरणा दिली नसती तर हे शक्य झाले नसते असे तिचे मत आहे.

तिचा नुकताच राज्यसभा सदस्य अविनाश राय खन्ना यांनी “Honor Of Punjab” हा पुरस्कार देऊन सत्कार केला आहे.
श्रुतीच्या या यशामुळे सुरेंदर कुमार यांच्या आख्ख्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Source: The Tribune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.