कोणकोणत्या देशांमध्ये भारताचे चलन वापरता येते ?

डॉलरला संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय चलन म्हणुन मान्यता आहे. जगातील ८५% व्यापार डॉलरच्या साहाय्याने केला जातो. जगभरातील ३९% कर्ज डॉलरमध्ये दिले जाते आणि एकूण डॉलरपैकी ६५% डॉलर अमेरिकेच्या बाहेर वापरले जाते.

मग भारताच्या रुपया चलनाला इतका आदर मिळतो का असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आला असेल. त्याचे उत्तर होय असे आहे. जरी आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपया सहजासहजी स्वीकारला जात नसला, तरी काही देशांमध्ये भारतीय चलन सहज वापरता येते. त्या देशांमध्ये भारत मोठ्या प्रमाणावर वस्तू निर्यात करत असल्यामुळे भारतीय चलन त्या देशात स्वीकारले जाते.

कोणकोणत्या देशांमध्ये भारताचे चलन वापरता येते ?

१) झिम्बाब्वे :

सध्या झिम्बाब्वेकडे स्वतःचे चलन नाही. २००९ मध्ये झिम्बाब्वे देशात आलेल्या अति-महागाईमुळे त्यांच्या चलनाचे मूल्य खूप घसरले होते. त्यामुळे त्यांनी इतर देशांच्या चलनांना त्यांच्या देशाचे चलन म्हणुन स्वीकारले आहे. २०१४ पासून भारताचे चलन झिम्बाब्वेमध्ये कायदेशीर चलन म्हणून वापरले जात आहे. झिम्बाब्वे व्यतिरिक्त इतर देशांनी भारतीय चलनाला कायदेशीर चलनाचा दर्जा दिला नसला तरी परस्पर समन्वयाने ते देश भारतीय चलन स्वीकारतात.

२) नेपाळ :

भारताच्या एका रुपयाची किंमत नेपाळमध्ये १.६० रुपये असल्यामुळे भारतातील अनेक व्यापारी नेपाळमध्ये व्यापार करतात. २०१६ मध्ये भारतात नोटबंदी झाली होती, तेव्हा नेपाळमध्ये ९४८ कोटी रुपयांचे भारतीय चलन चलनात होते.

३) भूतान :

नोंग्त्रुम हे भुतानचे अधिकृत चलन आहे. दोन्ही देशांच्या चलनाचे मूल्य जवळपास सारखेच असल्यामुळे भूतानमध्ये भारताचे चलन सहज स्वीकारले जाते. भूतानच्या एकूण निर्यातीपैकी ७८% निर्यात भारतात केली जाते.

४) बांगलादेश :

टका हे बांगलादेशचे अधिकृत चलन आहे. भारताच्या एका रुपयाची किंमत बांगलादेशमध्ये १.१७ रुपये आहे. भारत आणि बांगदेशातील व्यापार जवळपास ६५०० कोटींच्या आसपास असल्यामुळे बांगलादेशात मोठ्या प्रमाणात भारतीय चलनाचा वापर केला जातो.

५) मालदीव :

भारताच्या एका रुपयाची किंमत मालदीवमध्ये ०.२२ रुपये आहे. मालदीवच्या काही भागात भारताचा चलन सहज स्वीकारला जाते. भारत आणि मालदीवमध्ये जवळपास १५०० कोटींचा व्यापार आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.