महाराष्ट्रात कोरोनाचा एक दिवसात वाढलेला आकडा चिंता वाढवणारा!

कोरोना महामारीने मागील काही महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. भारतात देखील कोरोनाच्या रुग्णात झपाट्यानं वाढ होत आहे. काल देशात कोरोना रुग्णाचा आकडा २५ ने वाढला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचा आकडा देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या ६३ वर पोहचली आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातील वाढ सर्वांची चिंता वाढवणारी आहे. राज्यात सध्या ७ तपासणी लॅब सुरु करण्यात आल्या असून त्यामध्ये कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या काल ५२ होती. मात्र यामध्ये एका दिवसात ११ रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मुंबईतील १० आणि पुण्यातील १ रुग्णाचा समावेश आहे.

काल नव्याने पॉसिटीव्ह झालेल्या रुग्णात ८ जण परदेशातून आले आहेत तर ३ जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या ६३ रुग्णांमध्ये देखील १२-१४ जण संसर्ग झालेले असून उर्वरित रुग्ण हे बाहेर देशातून आलेले आहेत.

महत्वाची शहरं शटडाऊन-

काल मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरांमध्ये शटडाऊन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या घोषणेनंतर या शहरांतील दुकानं बंद केल्यानं इथले कामगार, विद्यार्थी हे सगळेजण आपापल्या घरी जाण्यासाठी रेल्वेमध्ये गर्दी करत आहेत. रेल्वेच्या तिकीटघरात लांबच लांब रांगा लावून तिकीट काढण्याचं प्रयत्न करत आहेत. रेल्वे मंत्र्यांना सांगून जास्तीच्या रेल्वे उपलब्ध करून देण्यास मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार-

कोरोना विषाणूने चीननंतर आता युरोप खंडाला विळखा घातला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका इटलीला बसला असून, काल दिवसभरात इटलीमध्ये तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे युनायटेड किंग्डममध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.