देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता पाच लाखाच्या वर जाऊन पोहचली आहे. सध्या देशात अनलॉकचा दुसरा टप्पा सुरु आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न होत आहेत मात्र यात अजूनही यश मिळत नाहीये. जसजशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसं कोरोनामुळे मृतांचा आकडा देखील खूप वाढत आहे.
कोरोना रुग्णांना जिवंत असताना जसं अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे तसं मृत्यूनंतर देखील हालच सहन करावा लागत आहेत. याचाच प्रत्येय येणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी अनेक ठिकाणी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्तांच्या मृ तदेहाकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. पण नंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. पण बेल्लारी जिल्ह्यात या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ८ कोरोनाबाधितांचे मृ तदेह एकाच खड्यात अक्षरशः फेकून दिले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली आहे. जेडीएसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सावध राहा असं म्हटलं आहे.
बघा व्हिडीओ-
BEWARE!
By chance, if you or your family members die because of COVID-19, this is how the BJP Govt. in Karnataka throws away your body with many others into a single pit!
This is the 'well-planned COVID management' that the Govt. talks about everyday in the media! pic.twitter.com/jwIfhrcjN1— Janata Dal Secular (@JanataDal_S) June 30, 2020
‘जर तुमच्या घरातल्या कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भाजपा सरकार कर्नाटकमध्ये असे मृ तदेह फेकून देत आहेत’ असं म्हणत जेडीएसने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये PPE किट घातलेले कर्मचारी उभ्या असलेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढतात. त्यानंतर एका मागोमाग एक मृ तदेह एका मोठ्या खड्ड्यात टाकतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.