धर्मशास्त्रामध्ये आणि आरोग्यशास्त्रामध्ये तांब्याच्या भांड्याला फार महत्व आहे. धर्मशास्त्रात कुठल्याही मंगल किंवा पवित्र कार्याच्या वेळी तांब्याचा कलश वापरायला सांगितले जाते. तसेच आरोग्यशास्त्रामध्येही सकाळी सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. तांब्याच्या भांड्यातून अन्न खाण्याची आणि पाणी पिण्याची ही परंपरा शतकानुशतके चालू आहे.
परंतु तुम्हाला माहिती आहे का, की तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या काही पेय पदार्थांचे सेवन हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरु शकते ? आज आम्ही तुम्हाला त्याच पेयांविषयी सांगणार आहोत, जे तांब्याच्या भांड्यातुन प्यायल्यास तुमच्या आरोग्याचे बरेच नुकसान होऊ शकते. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊ..
१) ताक –
ताक हे दह्यापासून तयार केले जाते. ताक हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु आपण जर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ताक घेतल्यास त्याने तुमच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. ताकात असलेल्या आम्लाची तांब्याशी रासायनिक अभिक्रिया होऊन शरीरास अपायकारक असे घटक तयार होतात, जे आरोग्यासाठी घटक ठरू शकतात.
२) आंबट खाद्यपदार्थ – आंबट खाद्यपदार्थ, लोणचे इत्यादी वस्तू तांब्याच्या भांड्यात घेऊन त्यांचे सेवन केल्यास नुकसान होऊ शकते. या सर्व आंबट गोष्टी तांब्यासोबत रासायनिक अभिक्रिया करतात, त्यामुळे पदार्थांमध्ये शरीरास अपायकारक असे बदल होतात. तांब्याच्या भांड्यातील आंबट पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार होतात, उलटयांचा त्रास होतो.
३) आंबट फळांचे रस –
संत्री, मोसंबी, लिंबू, अननस, इत्यादी आंबट फळांचे रस तांब्याच्या भांड्यातून पिणे आरोग्यासाठी अपायकारक असते. क जीवनसत्व असणाऱ्या या फळांमधील आम्लाची तांब्याशी रासायनिक अभिक्रिया होते. असे आंबट रस तांब्याच्या भांड्यातून घेतल्यासआपणास गॅस, पोटदुखी, उलट्या होऊ शकतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.