डोंगरांमध्ये असलेल्या एका भव्यदिव्य घराचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. हे घर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचे असल्याचा दावा यामध्ये करण्यात येत आहे. हे आलिशान दिसणारे घर एखाद्या राजवाड्यासारखे आहे.
ट्विटरवर अनेक यूजर्सनी ‘ हे बघा बेरोजगार गुलाम नबी आझाद यांचं काश्मीरमधील घर’ असं लिहून पोस्ट केली आहे. हे फक्त सामान्य लोकांनीच नाही तर रॉ च्या एका माजी अधिकाऱ्याने देखील पोस्ट केली. नंतर त्यांनी हि पोस्ट डिलीट केली आहे.
पण या फोटोची सत्यता तपासली असता हा फोटो गुलाम नबी यांच्या घराचा नसून तो एका फाईव्ह स्टार हॉटेलचा आहे. ताज हॉटेलच्या चैन मध्ये असणाऱ्या विवांता डल व्यू चा हा फोटो आहे. हे हॉटेल श्रीनगर मध्ये असून हे गुलाम नबी यांचं घर नाहीये.
गुगल वर इमेज सर्च केली असता त्यामध्ये हा फोटो अनेक साईटवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. विवांता हॉटेलच्या अधिकृत वेबसाईटवर तपासलं असता असाच फोटो तिथेही उपलब्ध आहे.
जम्मू काश्मीरमधून नुकतेच कलम ३७० हटवण्यात आले. त्यानंतर देशभरात याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होत्या. देशात या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. तर काँग्रेससह अनेक पक्षांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला. काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद यांनी देखील या निर्णयाला कडाडून विरोध केला.
गुलाम नबी आझाद यांनी कलम ३७० हटवल्याप्रकरणी तीव्र शब्दात वेगवेगळ्या प्रद्धतीने निषेध नोंदवला असून या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.