महाराष्ट्रात अनेकदा ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय काय हा प्रश्न विरोधकांनी अनेक वेळा उपस्थित केला आहे यावर मातोश्रीने लक्ष दिले नाही. परंतु अनेकांना आजही उस्तुकता आहे कि मातोश्रीचा उत्पनाचा स्त्रोत काय आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या कडे किती संपत्ती आहे ? आता या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकिचा अर्ज भरून पडदा पाडला आहे.
यापूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरताना उद्धव ठाकरे यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. आदित्य यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने आणि २० लाख ३९ रुपयांचे बॉन्ड्स आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे 143 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. तसंच मातोश्री आणि मातोश्रीच्या समोर निर्माणाधीन असलेली दोन घरे आणि कर्जतमध्ये एक फार्महाऊस आहे. त्यांनी उत्पन्नाचे साधन हे विविध कंपन्यांच्या शेअर्स मधून येणार डिव्हीडंट, भागीदारी असल्याचं म्हटलं आहे.
प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व तक्रारींचाही तपशील देण्यात आला आहे. उद्धव यांच्याविरुद्ध एकूण २३ गुन्हे दाखल होते. त्यापैकी १२ गुन्हे रद्द झालेले आहेत तर अन्य खासगी तक्रारी आहेत. उद्धव ठाकरे हे संपत्ती जाहीर करणारे दुसरे ठाकरे ठरले आहेत.
आपल्याला वरील माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.