भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटायचे नाव घेत नाहीये. सत्तेतील समान वाटा मिळावा यासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही आहे. शिवसेनेकडून वारंवार मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला जात आहे. तर भाजपने आपलाच मुख्यमंत्री होणार यावर ठाम आहे.
शिवसेना भाजपने महायुतीमध्ये बहुमत मिळवले आहे. पण सत्तेतील फॉर्मुला निश्चित होत नसल्याने दोन्हीही पक्ष सत्तास्थापनेसाठी पुढे सरसावले नाहीयेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लागले होते. आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य निवडणूक लढला आहे. ते मोठे मताधिक्याने निवडून आले.
त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेतील अनेक नेते आग्रही आहेत. पण फडणवीस यांनी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येत्या २-३ दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होईल.
दरम्यान एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने मुख्यमंत्रीपदासाठी दोन युवा आमदारांची नवे सुचवली आहेत. माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या ऐवजी या २ आमदारांना पसंती दिली आहे.
या २ युवा आमदारांपैकी एकाला करा मुख्यमंत्री-
सुरेश खोपडे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी नवनियुक्त आमदार आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्या नावाला पसंती दिली आहे. त्यांच्या मते हे दोन्ही युवा आमदार ‘आऊट ऑफ बॉक्स थिकिंग’ करणारे ठरू शकता. बाकीचे नेते आहे ती व्यवस्था तशीच ठेवून स्वार्थ साधण्यासाठी या पदाचा उपयोग करतील. तरुण मात्र वेगळं काही करू शकता.
सुरेश खोपडे यांनी फेसबुक पोस्ट करून यावर भाष्य केले आहे. सुरेश खोपडे यांनी लिहिले आहे, ‘देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झालेले, हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राज्याला भूतकाळाकडे घेऊन चाललेले नेते आहेत. एकनाथ शिंदे हे पुराणमतवादी, शिवसेना स्टाईलने म्हणजे दडपशाहीने काम करणारे नेते वाटतात, तर अजित पवार हे अहंकारी व सरंजमदारी पद्धतीने काम करणारे राजकारणी आहेत. त्याऐवजी, २१व्या शतकाचा वारा हुंगलेली, जागतिकीकरणाची चव चाखलेली, रंगाच्या झेंड्याने नजर कलुषित न झालेली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसावी असं वाटतं.’
दरम्यान शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्यास वाव असून ते मिळाल्यास आदित्य याना मुख्यमंत्रीपद मिळते का बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीने अगोदरच विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केल्याने रोहित पवार यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची कुठलीही आशा नाहीये.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.