मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची अट ठेवल्याने भाजपाला पुन्हा युतीची सत्ता स्थापन करण्यास अडचणी आल्या आहेत. यामुळे उद्या सध्याच्या फडणवीस सरकारची मुदत संपुष्टात येणार असल्याने त्यांनी आज राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी जबाबदारी दिली आहे.
फडणवीस यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. अडीज वर्षांचा जो काही विषय आहे. स्पष्ट सांगतो माझ्यासमोर ही चर्चा झालीच नाही. बोलणीवेळीही हा विषय झाला नव्हता. त्यामुळे दिवाळीच्या वेळच्या अनौपचारिक चर्चेत तसे बोललो. उद्धव ठाकरे यांती अमित शहा यांच्याशी बोलले असतील तर मला माहिती नाही. शहा, मोदी यांना विचारले असता त्यांनीही या विषयावर बोलणे झाले नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेवर गंभीर आरोप-
फडणवीस म्हणाले गेल्या पाच वर्षांत आणि गेल्या १० दिवसांत मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. एवढी टीका काँग्रेसनेही केली नाही.
मोदींविरोधात असे शब्द वापरणे सुरूच राहणार असेल तर सरकार कशाला चालवायचे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांना आमच्याशी चर्चा करण्यास वेळ नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता. अगदी दिवसाला तीन तीन वेळा ते जात होते, असे गंभीर आरोप त्यांनी केले.
शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला.
दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करू शकलो नसल्याचे शल्य सांगताना त्यांनी खंत देखील व्यक्त केली आणि पुढील सरकार भाजपाचेच असेल असेही फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम-
शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.