चिनी वस्तू एवढ्या स्वस्त का असतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी ही कथा वाचा. एकदा एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करत असतात. पोपटाने विमानात दंगा धुडगूस घालायला सुरुवात केल्यावर मालक त्याला विमानाच्या बाहेर फेकून देतो. पोपट मालकाला वाकुल्या दाखवून हसतो. मालकाला वाटते बाहेर खूपच मौज दिसते.
मग तो देखील दंगा धुडगूस घालायला सुरुवात करतो. त्यालाही बाहेर फेकण्यात येते. पण बाहेर आल्यावर मालकाची बोबडी वळते. खाली कोसळताना त्याला पोपट भेटतो. तो पोपटाला विचारतो, हे काय करायला लावलंस ? त्यावर पोपट बोलतो, अरे वेड्या माझ्याकडे तर पंख आहेत, तुला कोणी करायला सांगितले होते. तात्पर्य – माणसाकडे स्वतःचे विशेष कौशल्य असल्याशिवाय तो जगावेगळ्या गोष्टी करु शकत नाही.
सध्या चीन देखील जगावेगळ्या गोष्टी करण्याचाच प्रयत्न करत आहे. कोरोना सारख्या महामारीचे मूळ असतानाही चीन इकडे भारतासोबत सीमेवर वाद घालत आहे. दुसरीकडे अमेरिकेला अंगावर घेत आहे. चीनमध्ये एवढे धाडस कुठून आले ? चीनला हे पंख कुठे गवसले ? तर आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की चीनची ताकत आहे त्यांचे व्यापार मॉडेल !
काय आहे चीनचे व्यापार मॉडेल ?
चीनचे व्यापार मॉडेल दुसरेतिसरे काही नसून त्यांचे उत्पादन आणि विक्री करण्याचे कसब आहे. चीन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करणारा देश आहे. १) कमी प्रमाणात मोठमोठ्या गोष्टी तयार करण्यापेक्षा जास्त प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टी तयार करणे हे चीनचे उत्पादन धोरण आहे. याला अर्थव्यवस्थेच्या भाषेत “इकॉनॉमी ऑफ स्केल” असे म्हणतात. छोट्या वस्तूंचे उत्पादन वाढवल्याने नफा वाढतो, याच तत्वावर चीन चालतो.
२) चीनजवळ अलीबाबा सारखे असे उत्पादक आहेत जे अशा छोट्या छोट्या वस्तूंची निर्मिती करतात आणि वेगवेगळ्या इ-कॉमर्स साईट्स उदा.अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, इत्यादि. यांना विकतात. त्यामुळे चीनच्या वस्तूंना विक्री साखळी तयार होते.
चीनच्या वस्तू एवढ्या स्वस्त का असतात ?
चीनच्या वस्तू स्वस्त असण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण, इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये लेबर कॉस्ट म्हणजेच कामगारांना कामाच्या बदल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कमी किंमत अदा करावी लागते. या किंमती कमी असल्या कारणाने चीनला उत्पादनासाठी कमी खर्च येतो. त्यामुळे पुढे चीन कमी दरात वस्तूंची विक्री करतो. दुसरे कारण, चीन कमी खर्चामध्ये वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतो. त्यामुळे त्यांना वस्तू कमी दरात आणि जास्तप्रमाणात विकत येतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.
Leave a Reply