जगामध्ये अनेक प्रकारची लोकं राहतात. कोणी जगण्यासाठी खात असतात तर कोणी खाण्यासाठी जगत असतात. पण चीनच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथले लोक खाण्यासाठी जगत आहेत की काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. चीनच्या खाद्यसंस्कृतीबद्दल आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. चीनमध्ये बेडकांचे लोणचे बनवतात, वटवाघळांचे सूप बनवतात वगैरे गोष्टी आपण अनेकदा ऐकल्या असतील. परंतु आता चीनमध्ये वटवाघळाचे मांस खाल्ल्याने कोरोना रोग आला आणि संपूर्ण जगभरात पसरला अशी चर्चा असल्याने चीनच्या खाद्यसंस्कृतीबद्दलच्या एकूणच गप्पांना जास्तच रंग चढला आहे. यानिमित्ताने आपण जाणून घेणार आहोत चीनमधील लोकं काय काय खातात ?
चीनमधील लोकं कधीपासून असे अन्न ?
चिनी लोक तऱ्हेतऱ्हेचे जे पदार्थ खातात त्याबाबतीत असे म्हटले जाते की माओ-त्से-तुंगने ऑक्टोबर १९३४ ते ऑक्टोबर १९३५ याकाळात जियांगशी ते शांगशी यादरम्यान जी पदयात्रा केली होती, तेव्हा चिनी लोकांना काहीही पदार्थ खाण्याची सवय लागली. या पदयात्रेत सामील झालेल्या लाखो लोकांनी एका वर्षात ९००० किमी अंतराचा प्रवास केला. त्यांचा हा प्रवास अतिशय अवघड अशा दरीखोऱ्यातून आणि घनदाट जंगलातून होता. या प्रवासादरम्यान लोकांना जीवंत राहण्यासाठी चव, रंग, आकार याचा विचार न करता मिळेल ते अन्न खावे लागले.
चीनमधील लोकं काय काय खातात ?
चीनमध्ये ४२० प्रजातीच्या प्राण्यांचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात आली असली तरी कदाचित हे वाचल्यानंतर तुम्हाला उलटी येईल. चीनचे लोक डुकरांचे मांस, वटवाघळाचे सूप, प्राण्यांच्या रक्ताचे सूप, अस्वलाचा पंजा, माकडाचा मेंदू, जिवंत सापाचे रक्त, कासवाचे रक्त, प्राण्यांची शिंगे, मगरीचे मांस असे पदार्थ खातात. चीनच्या वेगवगेळ्या शहरांतील खाऊगल्ल्यांमध्ये छोटे साप, सुरवंटाच्या अळ्या, सरडे, झुरळ, कोळी, विंचू असे तळलेले पदार्थ मिळतात.
वाळवलेले सरडे, पाली, बेडूक, सापाची पिल्ले, उंदीर, गोगलगाय, मुंग्या देखील चीनचे लोक आवडीने खातात. चीनच्या काही भागात कुत्रा आणि मांजराचे मांस देखील खाल्ले जाते. चीनच्या वेट मार्केटमध्ये १२० प्रकारचे सजीव विक्रीला असतात.
आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.