चिमणी पाखर सिनेमा अनेकांनी बघितला असेल अशीच काही वेळ आली आहे पश्चिम बंगाल मधील बलुरघाट ब्लॉकमधील चिंगीशपूर या ग्रामपंचायत मधील हि घटना आहे. सिनेमाच्या कथानका प्रमाणे हा सर्व प्रसंग घडला होता.
अजय आणि सुनिता मुलीचे वय ८ वर्ष आणि मुलाचे वय १२ वर्ष दोघेही स्थानिक सरकारी शाळेत शिकतात. त्यांचे वडील सुजित बाबू मजुरी करत होते. काही वर्षापूर्वी अचानक एक दिवस रात्री सुजित हा घरातून बेपत्ता झाला त्यांना वाऱ्यावर सोडून तो चालला गेला.
नवरा सोडूनही त्यांची आई गीतादेवी हि थांबली नाही दिवसा शेतात काम करून आणि बाकी वेळेत लोकांच्या घरात कामे करून तिने मुलांचा सांभाळ केला. परंतु मागील काही दिवसापासून ती बिमार होती बिमारी वाढल्यावर तिला बलूरघाट येथील सरकारी दवाखान्यात ७ सप्टेंबरला भरती करण्यात आले.
शेवटी रविवारी गीतादेवी यांचा मृत्यू झाला. आईचा अंत्यसंस्कार कसा करावा हे देखील या मुलांना माहिती नाही आहे. स्थानिक सूत्रांनी सांगितले की अजय-सुनीता यांचे कोणतेही नातेवाईक नाहीत. म्हणून शेजार्यांनी त्या दोन अनाथ भावंडांच्या सुरक्षेची तसेच शिक्षण आणि संगोपनसाठी सरकारी मदतीची मागणी केली.
सुनीता स्थानिक प्राथमिक शाळेच्या तिसर्या वर्गात शिकते. मुलगा आठवीत शिकतो. स्थानिक कालिकापूर प्राथमिक शाळेतून सध्या त्यांना जेवणाकरिता तांदूळ देण्यात आला. शेजारी काही अन्न देतात, मागील दहा दिवसापासून त्यांचा हा दिनक्रम सुरु आहे.
स्थानिक बिडीओ नि आश्वासन दिले आहे कि दोन्हीही मुलांना अनाथालय किंवा सरकारी होस्टेलला ठेवण्यात येईल. समाजातील दात्यांनी त्यांच्या साठी समोर येण्याची हीच वेळ आहे. त्यांचा सांभाळ करण्यासाठी समाजसेवी संस्थानि पुढाकार घ्यावा.
आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.