नव्वदच्या दशकात लहान मुलांसाठी ज्या मालिका प्रसारित व्हायच्या त्या मालिकांचे क्रेज खूप मोठ्या प्रमाणात असायचे. बच्चे कंपनीच नाही तर सर्वांच्या मनावर या मालिका अधिराज्य गाजवायच्या. या मालिकेतील कलाकार आता मोठे झाले आहेत. या बालकलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकांना उत्कंठा असते.
या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले बालकलाकार आता मोठे झाले आहेत. त्यातील काही जण आजही सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत तर काही वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापैकीच एक गाजलेली मालिका म्हणजे सोनपरी. परिच्या कथेवर असलेली हि मालिका नव्वदच्या दशकातील एक प्रचंड लोकप्रिय मालिका होती.
या मालिकेतील सोनपरी आणि फ्रुटी लोकांना प्रचंड आवडली. सोनपरी म्हणजेच सोना आंटीची भूमिका अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने तर फ्रुटीची भूमिका बालकलाकार तन्वी हेगडेने साकारली होती. तन्वी हेगडे सध्या कशी दिसते ती काय करते असे प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात येऊ शकता. तर खासरेवर जाणून घेऊया तन्वी सध्या काय करते..
सोनपरीची फ्रुटी आता झाली मोठी-
तन्वीने सोनपरीमध्ये साकारलेली फ्रुटीची भूमिका अनेकांची फेव्हरेट होती. हि फ्रुटी आता मोठी झाली असून ती सिनेसृष्टीत काम करते. तन्वीने मराठी चित्रपटात काम केलं आहे. सोनपरी मालिकेचे २६० एपिसोड प्रदर्शित झाले होते त्यानंतर हि मालिका संपली. मालिका जरी संपली तरी क्युट दिसणारी फ्रुटी आणि सोना आंटी हे कॅरॅक्टर लोकांच्या मनात कायम राहीले.
तन्वी हि ३ वर्षाची होती तेव्हापासून तिने आपल्या अभिनयास सुरुवात केली. रसना बेबी कॉन्टेस्टची विजेता ठरली होती. त्यानंतर रसना साठी तिने एक जाहिरातीत देखील काम केले होते. त्यानंतर ती सोनपरी मालिकेत दिसली आणि तेव्हापासून प्रसिद्धी झोतात आली.
याशिवाय तिने शाकालका बुमबुम मालिकेत देखील काम केले आहे. तन्वीने आपल्या करिअरमध्ये आजपर्यंत १५० हुन अधिक जाहिरातीत काम केले आहे. यशस्वी बालकलाकार म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर तीला अनेक सिनेमात देखील काम मिळायला लागले. तिने २००० मध्ये गज गामिनी या सिनेमात पहिल्यांदा भूमिका साकारली.
गज गामिनी हा सिनेमा सुप्रसिद्ध पेंटर एमएफ हुसैन यांनी त्यांची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षितला घेऊन हा सिनेमा बनवला होता. तन्वीने या सिनेमात बेबी शकुंतलाची भूमिका साकारली होती.
तन्वीने आतापर्यंत ‘चैंपियन’ (२०००), ‘विरुद्ध’ (२००५) आणि ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ (२००५) या हिंदी सिनेमात तन्वीने काम केलं आहे. ती शेवटी २०१६ मध्ये मराठी सिनेमा ‘अथांग’ मध्ये दिसली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.