नागपूरची दिव्या देशमुख दुसऱ्यादा बुध्दिबळात विश्वविजेता..

पोसूस द कालदस ब्राझील येथे झालेल्या जागतिक केडेट बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतीम सामन्यात भारताच्या दिव्या देशमुख ने विजय मिळवून एक इतिहास निर्माण केला आहे. या स्पर्धेत झालेल्या एकूण अकरा सामन्यात तिने आठ सामने जिंकले तर तीन सामने अर्निणीत राहिले. भारतातील १९ स्पर्धकापैकी तिने हि बाजी मारली आहे. १२ वर्ष वयोगटातील सध्या ती विश्वविजेता आहे.

तिच्या कडे हे दुसरे विश्वविजेता पद आले आहे. दिव्याने 2014 साली वयाच्या नवव्या वर्षी अंडर-१० चे जागतिक विजेतेपद पटकाविले होते.२०१३ मध्ये ती सर्वात कमी वयाची महीला फिडे मास्टर झाली होती. २०१२ मध्ये तिने Asian School Championship जिंकली होती.

शेवटच्या सामान्याआधी दिव्या ९ गुणावर होती. तिची प्रतीस्पर्धी अमेरिकाची मातुस नासतास्सजा ८.५ गुणावर होती. शेवटच्या सामान्यात Draw मुळे तिने विजय सोपा केला असतानाच शेवटच्या क्षणी अमेरिकाची मातुस नासतास्सजा हिच्यावर तिने मात केली आणि भारताच्या दिव्या देशमुखने हि स्पर्धा जिंकून देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिले. दिव्या देशमुख ही मूळची नागपूरची आहे, तिचे आईबाबा बालरोगतज्ञ आहेत.

जितेंद्र आणि नम्रता देशमुख यांची ती कन्या आहे. ती चेन्नईच्या RB रमेश यांच्या मागर्दशनाखाली बुद्धिबळाचे धडे घेते. यासाठी महीन्यातून आठवडाभर ती चेन्नईला असते. तिने तिच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील, गुरूजी आणि शाळेला दिले आहे. नागपूरच्या दिव्याच्या यशाने संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.