आज जगात चार्ली चॅप्लिनची आठवण सर्वोत्कृष्ट कॉमेडियन म्हणून काढली जाते, ज्याने त्याच्या अभिनयासोबतच विचित्र वेशभूषेने लोकांना हसवले. मूक चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात चार्ली सर्वात लोकप्रिय कलाकार होता. चार्लीने आपल्या आयुष्यातील निम्म्यापेक्षा जास्त काळ अभिनय, दिग्दर्शन, पटकथा, संगीत आणि चित्रपट निर्मितीमध्ये घालवला आहे.
महान चार्ली
चार्लीने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. अमेरिकेच्या टाईम मॅगझिनने आपल्या कव्हर पेजवर स्थान दिलेला चार्ली हा पहिला कलाकार होता. १९४० मध्ये चार्लीने हिटलरच्या आयुष्यावर “द ग्रेट डिक्टेटर” हा चित्रपट बनवला होता, त्यात त्याने स्वतः हिटलरची भूमिका करताना त्याची थट्टा उडवली होती.
कम्युनिस्ट असल्याचा आरोप लावून अमेरिकेने चार्लीला अमेरिकेत येण्यास प्रतिबंध केल्यानंतर चार्ली स्वित्झर्लंडला गेला. १९७३ मध्ये त्याच्या “लाईम लाईट” चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ संगीताबद्दल ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी उपस्थित लोक १२ मिनिटे टाळ्या वाजवत होते.
चार्लीचा चोरीला गेलेला मृतदेह असा मिळाला परत
१९६० मध्ये आलेला ‘अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग’ हा चार्लीच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर हळूहळू त्याची तब्येत ढासळण्यास सुरवात झाली. काही दिवसांनंतर चार्लीला बोलणेही कठीण झाले. २५ डिसेंबर १९७७ रोजी ख्रिसमसच्या दिवशीच स्वित्झर्लंडमध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी चार्लीने जगाचा निरोप घेतला. तिथेच त्याचा मृतदेह शवपेटीमध्ये दफन करण्यात आला.
परंतु त्यानंतर दोन-तीन महिन्यांनंतर चार्लीचा मृतदेह चोरीला गेला. चोरांनी चार्लीच्या कुटुंबाकडून ४ कोटींची खंडणी मागितली. पोलिसांनी सापळा रचून दोन चोरांना पकडले आणि त्यांचयकडून चार्लीचा मृतदेह असणारी शवपेटी ताब्यात घेतली. त्यानंतर पूर्वीच्याच ठिकाणी चार्लीचा मृतदेह सिमेंट कॉंक्रिटमध्ये दफन करण्यात आला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.