बॉलिवूडमधील काही कलाकार आपल्या रोलबाबत अतिशय संवेदनशील असतात. म्हणूनच आपल्या रोलला परिपूर्ण न्याय देण्यासाठी ते जीवतोड मेहनत घेतात. प्रेक्षकांनी त्यांच्या रोलमध्ये कुठली चूक काढू नये किंवा आपल्याकडून काही कमी राहून प्रेक्षक नाराज होऊ नयेत म्हणून ते कलाकार आपल्या भूमिकेविषयी सजग असतात. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्या भूमिकेत उतरण्यासोबतच आपल्या शरीरातही काही बदल करण्यास हे कलाकार मागेपुढे पाहत नाहीत. आज आपण त्या कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत…
१) कंगना राणावत : कंगना लवकरच जयललिताच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या लुकचे पहिले पोस्टरसुद्धा प्रदर्शित झाले आहे. हुबेहूब जयललितासारखे दिसण्यासाठी कंगनाला ‘हार्मोन पिल्स’ घ्यावे लागले होते.
२) आमिर खान : आमिर खान हा बॉलिवूडमधील असा कलाकार आहे, ज्याला आपल्या भूमिकेसाठी स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करण्याचा अनुभव आहे. दंगल चित्रपटात वयोवृद्ध दिसण्यासाठी आमिरने त्याचे वजन ९७ किलो केले होते.
३) रणबीर सिंग : रणबीर सिंग आपल्या भूमिकेच्या बाबतीत इतका वास्तववादी राहतो की, ‘लुटेरा’ चित्रपटातील एका दुःखद सीनमध्ये चेहऱयावर वेदना दिसण्यासाठी त्याने चक्क स्टेपल्सने स्वतःच्या पोटात पिन टोचवून घेतली होती.
४) राजकुमार राव : राजकुमार राव बॉलीवूडला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. “ट्रॅपड्” चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने तब्बल ११ किलो वजन कमी केले होते. त्यानंतर “बोस – डेड or अलाईव्ह” वेब्सिरीजसाठी तेवढेच वजन वाढवले होते.
५) फरहान अख्तर : ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात शिपायाची भूमिका निभावण्यासाठी फरहान अख्तरने ८ किलो वजन वाढवले होते, त्याच वेळी धावपटूची भूमिका करण्यासाठी तब्बल १० किलो वजन कमी केले.
६) रणदीप हूडा : सरबजीत सिंग वर आधारित असणाऱ्या ‘सरबजीत’ चित्रपटातील या भूमिकेसाठी रणदीप हुडाने एका महिन्यात तब्बल १८ किलो वजन कमी केले होते. रणदीपमधील हा बदल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.
७) हृतिक रोशन : ‘सुपर 30’ चित्रपटात बिहारचे गणितज्ञ आनंद कुमारच्या भूमिकेत दिसण्यासाठी हृतिक रोशनने वजन वाढवले होते. हे पात्र साकारण्यासाठी त्याने शूटिंगच्या काही काळ आधी वेट ट्रेनिंग घेणे बंद केले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.