निकालाआधीच ‘या ५’ उमेदवारांनी साजरा केला विजयाचा आनंद

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उभे असणाऱ्या सर्व उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंदीस्त झाले आहे. नेते, कार्यकर्ते, समर्थकांना दोन दिवसांची विश्रांती मिळाली आहे. आपल्या मदारसंघात कोण विजयी होईल, कुठल्या भागात किती मतदान झाले, कोणी मदत केली, कोणी फसवले असे ठोकताळे गप्पांमधून रंगायला लागले आहेत.

२४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु काही ठिकाणी निकालाच्या आधीच उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला असून आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे. पाहूया कोणकोण आहेत ते उमेदवार…

१) सचिन दोडके (खडकवासला जि.पुणे, राष्ट्रवादी काँग्रेस) :

पुण्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्यातील लढत जोरदार झाली. खडकवासला हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुप्रिया सुळेंविरुद्ध उभ्या असणाऱ्या कांचन कुल यांना या मतदारसंघात जवळपास ६०००० हुन अधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत सचिन दोडके यांनी जोरदार टक्कर दिली. निकालाच्या आधीच पुण्यामध्ये सचिन दोडकेंच्या समर्थकांनी विजयाचे होर्डिंग्स लावण्यात आल्याने निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

२) सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर मतदारसंघ जि.पुणे, भाजप) :

पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव असणाऱ्या सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेसचे दत्त बहिरट यांच्यातली लढती उत्कंठावर्धक आहे. सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन करुन त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.

सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान नगरसेवक आहेत तर दत्त बहिरट हे माजी नगरसेवक आहेत. शिवाजीनगर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असून काँग्रेसचे कार्यलयही याच भागात आहे. मतदानानंतर सिद्धार्थ शिरोळेंच्या समर्थकांनी फटाके वाजवून निकालाच्या आधीच विजयाचा आनंद साजरा केल्याने इथेही निकालाची सर्वांना उत्सुकता आहे.

३) हसन मुश्रीफ (कागल मतदारसंघ, जि.कोल्हापूर, राष्ट्रवादी काँग्रेस) :

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे संजय घाटगे यांच्यात काट्याची टक्कर असताना भाजपच्या समरजीत घाटगे यांनी बंडखोरी केल्याने कागलमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा खासदार निवडून असताना कागलमध्ये अटीतटीची निवडणूक झाली. मतदानानंतर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत मिरवणूक काढत आनंद साजरा केला. बंडखोरीमुळे या मतदारसंघातही निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

४) संजय कदम (दापोली मतदारसंघ, जि. रत्नागिरी, राष्ट्रवादी काँग्रेस) :

दापोली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम व विद्यमान आमदार काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्यात काटे की टक्कर झाली आहे.

आमदार संजय कदम यांनी प्रथेप्रमाणे मतमोजणी होण्याअगोदरच काल विजयी मिरवणूक त्यांच्या दापोली येथील कार्यालया पासून खेड पर्यंत काढली. खेड तालुक्यातील भरणा नाका येथील काळकाई मंदिराजवळ हि भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर त्यांच्या विरोधात उभे असलेल्या योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी देखील दापोली शहरातील विविध ठिकाणी मतमोजणी अगोदरच फटाके फोडले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.