बॉलीवूड स्टारच्या मुला मुलीबद्दल सामान्य लोकांसाठी नेहमी कौतुकाचा विषय राहिलेले आहे. आता शाहरुख खानची मुलगी बघा किंवा छोटा तैमुर यांच्या विषयी रोज काहीना काही बातमी तुम्हाला वाचायला मिळेल. तरी तैमुरने आणखी शाळेत जाने सुरु केले नाही त्यानंतर तो वापरत असलेल्या बुटापासून तर पेन पर्यंत सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला मिडिया पोहचविणार यात शंका नाही.
बर हे मुले शाळेत जातात का? हो जातात ना परंतु त्यांची शाळा आपल्यासारखी नाही आहे जिथे केस तेल लावून येणे, खाकी पैंट, पांढरा सदरा इथे विषय वेगळा असतो. मुंबईत अशी शाळा आहे जिथे फक्त प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची अधिकतर मुले शिकतात. आणि या शाळेचे नाव आहे धीरुभाई अंबानी स्कूल
आणि या शाळेची प्रमुख नीता अंबानी आहे. नीता अंबानी यांचे बॉलीवूड मध्ये चांगले मित्र आहेत हे तर सर्वाना माहिती आहे. मग मित्रांचे मुले त्यांच्या शाळेत येणारच ना, या शाळेच्या फी मध्ये खेड्यातील अनेक मुले शिकू शकतात.
या शाळेची फी केजी ते ७ व्या वर्गापर्यंत १ लाख ७० हजार एवढी आहे. या व्यतिरिक्त शाळेची सहल वगैरे करिता वेगळे पैसे मोजावे लागतात. वर्षातून तीनदा शैक्षणिक सहल इथे आयोजित केल्या जाते. शाळेत कमी विद्यार्थी असल्याने प्रत्येक विद्यार्थ्या कडे विशेष लक्ष दिल्या जाते.
वर्ग ८ ते १० करिता फी १ लाख ८५ हजार एवढी आहे. आणि वरील प्रमाणे सहल, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी करिता वेगळा खर्च दिल्या जातो. या शाळेत कोण कोण शिकले हे माहिती आहे का ?
अर्जुन आणि सारा तेंदुलकर (सचिन आणि अंजलि तेंदुलकरची मुले) सुहाना आणि आर्यन खान (शाहरुख़ व गौरी) आराध्या बच्चन (ऐश्वर्या व अभिषेक) जानवी कपूर (श्रीदेवी व बोनी कपूर) रेहान आणि रिदान रौशन (ऋतिक व एक्स-वाइफ सुजैन) इरा खान (आमिर खान व एक्स-वाइफ रीना) शक्या आणि अकीरा अख्तर (फरहान व अधुना अख्तर) अन्या, दीवा आणि त्ज़ार कुंदर (फराह खान व शिरीष कुंदर)
हि प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची मुले इथे शिकली आहे. इथे मोठ्या घरातील विद्यार्थी असल्यामुळे त्यांची काळजी देखील तशीच घेतली जाते. सिक्युरिटी करिता विशेष लोक इथे कामाला आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.