कारमध्ये एसी वापरताना घ्या हि खबरदारी होऊ शकतात अनेक आजार…

खासरे वर आम्ही आमच्या वाचकांना काही खासरे माहिती पाठवायची असल्यास info@khaasre.com हा इमेल आयडी दिला होता याच आयडीवर आलेली एक आरोग्यास अंत्यत उपयोगी माहिती आम्हाला तानाजी चव्हाण यांनी पाठवली आहे नक्की वाचा कारमध्ये एसी वापरताना घ्यायची काळजी ज्यामुळे आपण अनेक रोगापासून वाचू शकतो.

जेव्हाही आपण कार मध्ये बसतो तेव्हा सर्व प्रथम AC चालु करतो.कार मधील AC वापरण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात असू द्या कारण या AC चा परिणाम तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो. कार मधील AC चालू करण्यापूर्वी कारच्या सर्व खिडक्या थोडा वेळ उघड्या ठेवा. याचे कारण कार मध्ये असणारा बेन्झीन वायु आहे. बेन्झीन हा एक नैसर्गिक पण विषारी वायु आहे. बेन्झीन मुळे कर्क रोग होण्याची शक्यता असते. जेव्हा खिडक्या बंद असलेली कार उन्हात उभी असते तेव्हा गरम हवे मुळे कार मध्ये बेन्झीन वायु तयार होतो. याचे कारण कार चे डॅशबोर्ड, सीट, ए सी डक्ट असे बरेच भाग प्लास्टिकचे बनले आहे आणि हे प्लास्टिक गरम हवेमध्ये बेन्झीन वायू तयार करतात.

खिडक्या बंद करून पार्क केलेल्या कार मध्ये ४०० ते ८०० मिलीग्राम बेन्झीन तयार होतो, हा वायू स्वीकृत स्तरा पेक्षा ८ पट जास्त आहे. जर बाहेरचे तापमान ३० अंश सेन्टीग्रेड पेक्षा जास्त असेल तर बेन्झीन चा स्तर २०००-४००० मिलीग्राम होतो, म्हणजेच स्वीकृत स्तरापेक्षा ४० पट जास्त होतो. जो व्यक्ती खिडक्या बंद असलेल्या कार मध्ये बसतो तो आपल्या श्वासाद्वारे जास्तीत जास्त बेन्झीन शरीरात घेतो. हा वायु व्यक्तीच्या मूत्रपिंड, यकृत,आणि हाडांमध्ये जातो आणि मग तो शरीरातून बाहेर काढणे कठीण जाते. बेन्झीन मुळे रक्तक्षय तसेच पांढऱ्या पेशी कमी होऊ शकतात. गर्भवती महिलेचा गर्भपात होऊ शकतो.कार मध्ये बसल्यानंतर जेव्हा तुम्ही लगेचच ए सी चालू करता तेव्हा तो थंड हवा न फेकता गरम हवा फेकतो. या गरम हवेमध्ये बेन्झीन असतो.यावर सोपा उपाय म्हणजे कार मध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम कारच्या सर्व खिडक्या उघडा . त्यामुळे कार मधली बेन्झीन असलेली गरम हवा बाहेर जाऊन बाहेरची थंड हवा आता येईल.त्यानंतर खिडक्या बंद करून ए सी वापरा. तुम्हाला हि माहिती महत्वाची वाटत असेल तर नक्कीच पुढे शेअर करा.

राहुल तानाजी चव्हाण मो.8956378073
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपले खासरे लेख तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.
सर्पदंश झाल्यावर करायचा प्रथोमपचार… साप विषारी किंवा बिनविषारी कसे ओळखावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.