अशी तर हि एका थंडपेय कंपनीची लाईन आहे- ये दिल मांगे मोर, परंतु या ओळीस कोणी ओळख दिली तर ती काश्मीर रायफलचा शूर सैनिक कॅप्टन विक्रम बत्रा. विक्रम बत्रा भारतीय सैन्यात एक अधिकारी होते ज्यांनी कारगिल युद्धात अद्वितीय साहसाचा परिचय देऊन शहीद झाले. मृत्युपश्चात त्यांना सर्वोच्च परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
चला आज आपण या वीर सुपुत्रा विषयी काही माहिती बघूया ज्याचा सर्व भारतीयांना गर्व वाटेल. वाटायलाच हवा कारण विक्रम बात्राने कामच असे केले…
कोण होते विक्रम बत्रा ?
पालमपूर येथील जी एल बत्रा व कमलकांता बत्रा याच्या घरी ९ सप्टेंबर १९७४ रोजी दोन मुली नंतर जुळे झाले, म्हणून त्यांनी त्याचे नाव लव कुश ठेवले. लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल. पदवी पूर्ण झाल्यावर विक्रमनि सैन्यात जाण्याच ठरविले आणि सीडीएस ची तयारी सुरु केली. या दरम्यान विक्रम ला हॉंगकॉंग येथे चांगल्या पगाराची मर्चट नेवी मध्ये नौकरीची संधी मिळाली , परंतु देश सेवा हेच स्वप्न असेलला विक्रमने हि नौकरी स्वीकारली नाही. १९९७ मध्ये जम्मू मधील सोपोर नामक ठिकाणी सेन्याच्या १३ जम्मू कश्मीर रायफल्स मध्ये लेफ्टनंट या पदावर नियुक्ती मिळाली.
कारगिल चे युध्द
एक जून १९९९ ला त्याची तुकडीला कारगिल युद्धास रवाना करण्यात आले. हम्प व राकी हे दोन ठिकाण जिंकल्या मुले विक्रमला कॅप्टन म्हणून पदोन्नती मिळाली. यानंतर श्रीनगर लेह मार्गाच्या ठीक वर सर्वात महत्वाचे ठिकाण ५१४० शिखर हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून सोडविण्या करिता जवाबदारी कैप्टन विक्रम बत्रा यांच्या वर देण्यात आली. अतिशय दुर्गम क्षेत्र असून विक्रम ने आपल्या सोबत्या सोबत २० जून १९९९ ला शकली तीन वाजता अंधारात या शिखरावर आपला ताबा मिळवला.
शेर शाह नावाने प्रसिध्द
विक्रम बत्रा ने या शिखरा वरून आपला विजयी घोष ‘ये दिल मांगे मोर’ असा दिला तेव्हा संपूर्ण सैन्यात व भारतात त्याचे नाव प्रसिध्द झाले. ये दिल मांगे मोर हि लाईन बघता बघता कारगिल युध्दात संपूर्ण क्षत्रूला फजितीची ठरली. सगळी कडे हाच घोष ये दिल मांगे मोर…
याच दरम्यान विक्रमला कोड नाव शेर शहा व कारगिल का शेर या नावाने लोक ओळखू लागले. ४८७५ ताब्यात घेण्याची सैन्याने तयारी सुरु केली. याची जवाबदारी विक्रमला देण्यात आली. त्याने संधीचे सोने केले आणि जीवाची पर्वा न करता लेफ्टनंट अनुज नायर सोबत अनेक पाकिस्तानी सैनिकांना मुतृच्या दारात धाडले.
अंतिम शब्द ‘जय माता दी’
मिशन जवळपास पूर्ण झालच होता. परंतु आपल्या सोबत्याला वाचविण्या करिता जीवाचे बलिदान दिले.
एका ग्रेनेडच्या स्फोटात डावा हात उखळतो, -दुसऱ्या ग्रेनेडने उजवा हात दूरवर फेकला जातो. तरी पुढे झेप घेतो…
मशीन गनच्या दोन मोठ्या गोळ्या मांडीत घुसतात. दुसरा पाय rmg स्फोटाने निखळतो. नुसतं धड शिल्लक राहिलं तरी, त्या नुसत्या धडाने सरकत-सरकत शत्रूदिशेने जात राहतो.
अशा अनेक कोवळ्या 24 वर्षाच्या विक्रम बत्रांसारख्याच्या मेंदूच्या त्या 24 वेटोळ्यात, काय असतं नेमकं? की ईवल्याशा एका वितभर छातीत, 24-24 गोळ्या घुसत असताना अन सगळं शरीर निकामी झालं असताना — फक्त उरल्या काही श्वासानी सरपटत शत्रूवर चवताळून जायची अशक्य इच्छा कुठून येते यांच्यात ?
जय माता दि म्हणत त्याने जीव सोडला…
अद्भुत साहस आणि पराक्रम विक्रम बत्रा ला १५ जून १९९९ ला संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्राने त्याला सन्मानित करण्यात आले.
१६ जूनला आपला जुळा भाऊ विशाल ला त्याने पत्र लिहिले होते त्यात लिहल कि “ प्रिय कुश, आई व बाबाची काळजी घे… इथे काहीही होऊ शकते….
विक्रम च्या आयुष्यावर चित्रपट
LOC Kargil या चित्रपटात विक्रमच्या भूमिकेत आपण अभिषेक बच्चन ला बघू शकता…
विक्रम बत्रा यांची मुलाखत… पुढील बागात आपण बघूया विक्रम बत्राची प्रेम कथा जी वाचून डोळ्यात पाणी येणारच
We are proud of you. Salute you.