आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे. आज फैसला होणार आहे कोण असेल पुढचा आमदार ! महायुती पुन्हा सत्तेत येत असली तरी भाजपचे संख्याबळ घेतले आहे. आपण बघितले की विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी विजयाचा आनंद साजरा केला होता. अनेकांनी विजयाचे बॅनर लावले होते. त्या उमेद्वारांचे काय झाले हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या उमेदवारांचा निकाल काय लागला.
१) हसन मुश्रीफ, कागल –
राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल मतदारसंघातील उमेदवार हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे संजय घाटगे तसेच बंडखोर उमेदवार समरजितसिंह घाडगे यांच्यात अटीतटीची लढत होती. हसन मुश्रीफ यांच्या समर्थांनी मतदानानंतरच विजयाचा आनंद साजरा केला होता. अपेक्षेप्रमाणेच हसन मुश्रीफ यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
२) संजय कदम, दापोली –
दापोलीमध्ये राष्ट्रवादीचे संजय कदम आणि शिवसेनेचे योगेश कदम यांच्यात चुरशीची लढत होती. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी मतदानानंतर मिरवणूक काढली होती. संजय कदम यांनीही मतदानानंतर विजयी मिरवणूक काढून आनंद साजरा केला होता. या निवडणुकीत योगेश कदमांनी बाजी मारत विजय संपादन केला.
३) सिद्धार्थ शिरोळे, शिवाजीनगर –
पुण्याचे भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यातही काट्याची टक्कर पाहायला मिळाली. सिद्धार्थ शिरोळे यांच्या समर्थकांनी मतदानानंतर फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला होता. या निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे यांनी अपेक्षित विजय मिळवला आहे.
४) सचिन दोडके, खडकवासला –
खडकवासला मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे सचिन दोडके आणि भाजपचे भीमराव तापकीर यांच्यात जोरदार लढत झाली. सचिन दोडके यांच्या समर्थकांनी विजयाचे बॅनर लावून निकालाआधीच जल्लोष केला होता. शेवटपर्यंत हि लढत चुरशीची झाली. शेवटच्या निर्णायक क्षणी भीमराव तापकीर विजयी झाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.