विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल काहीही आले असले तरी प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला ज्यापद्धतीने उमेदवाराने मेहनत घेतली ते पाहता महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या लढती होणार असल्याचे चित्र आहे.
मतदानादिवशी एक एक मत महत्वाचे असल्याने उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यापासून त्यांना मतदान केंद्रावर ने आण करण्यापर्यंतचे सगळे प्रयत्न केले आहेत. अशामध्ये प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळीही काटेकोरपणे मतमोजणी होण्यासाठी उमेदवार दक्ष झाले आहेत.
पुण्यामध्ये या उमेदवाराने केली VVPAT चिठ्ठ्या मोजण्याची मागणी
पुण्यातील खडकवासला मतदारसंघातही भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत आहे. राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून VVPAT चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची मागणी केली आहे.
आपल्या पत्रात त्यांनी सांगितले आहे की, “मतमोजणी करतेवेळी सर्व EVM मशीनच्या मतमोजणी सोबतच सर्व VVPAT चिठ्यांची मतमोजणी आम्हाला करुन दाखवावी.” त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
निकालाआधीच लावले पुण्यामध्ये बॅनर
निकालाची तारीख २४ ऑक्टोबर असली तरी २१ ऑक्टोबरला मतदान पार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंच्या समर्थकांनी पुण्यामध्ये जागोजागी सचिन दोडकेंना विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. आपण केलेला प्रचार, विरोधकांचा कारभार, खडकवासला मतदारसंघातील प्रश्न इत्यादि विषयांवरून लोक यावेळी खडकवासल्यात नक्की परिवर्तन घडवतील असा त्यांना विश्वास आहे.
२४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.