भारतीय सीमा सुरक्षा दल यांच्या तर्फे देण्यात आलेली अनोखी मानवंदना नक्की बघा…
भारत पाकिस्तान व भारत बांगलादेश सीमेचे रक्षण हे जवान १९६५ पासून करत आहे. जमीन,पाणी,वाळवंट,बर्फ कठीणतम परिस्थितीमध्ये हे जवान काम करतात. 2,57,363 सैनिक रोज सीमेचे खडा पहारा देऊन संरक्षण करतात. त्यांच्या तर्फे हा विडीओ नक्की बघा…
जीवन पर्यन्त कर्तव्य हे त्यांचे ब्रीदवाक्य हा विडीओ व फोटो बघून सत्य ठरविते कि जीवन पर्यन्त कर्तव्य…
भारतीय सीमा सुरक्षा जवानांबद्दल प्रत्येकाना आदर आहे परंतु हे फोटो बघून आदर आणखीच वाढेल. पुरामध्ये चार ते पाच फुटांपर्यंतच्या पाण्यात हे जवान आपल्या मातृभूमीचं रक्षण करत आहेत.
ऊन, वारा, पाऊस… कशाचीही तमा न करता आपले सैनिक सीमेवर कसा खडा पहारा देत आहेत, याचे फोटो सीमा सुरक्षा दलाने जारी केले आहेत. हे फोटो पाहून आपल्या जवानांबद्दलचा आदर आणखीच वाढेल. पुरामध्ये चार ते पाच फुटांपर्यंतच्या पाण्यात हे जवान आपल्या मातृभूमीचं रक्षण करत आहेत.
देशाच्या अनेक राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अशा अनेक परिसरात पाच फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. परंतु अशा कठीण स्थितीतही पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांचे काही फोटो समोर आले आहेत.
सदर फोटो हे BSF च्या अधिकृत Twitter वर टाकण्यात आले आहे. परंतु फोटो कुठले आहेत या बाबत BSF ने अजून खुलासा केला नाही आहे…
अशा परिस्थितीत देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांना सलाम…