‘असा’ बुक करा रिलायन्सचा जिओ फोन

बहुचर्चित जिओ फोनची बुकिंग आता सुरु झालेली आहे. २१ जुलैला सर्वसामोर हा फोन दाखविण्यात आल्या नंतर आता फोन करिता Pre Booking करता येणार आहे. १५ ऑगस्ट २०१५ सायंकाळी ५:३० वाजल्यापासून फोनची बुकिंग लोकांनी सुरु केली आहे. तुम्ही सुध्दा हा फोन बुक करू शकता खालील Step वापरून जिओ फोन बुक करता येणार.

जिओ फोन हा मोफत आहे. तुमच्या कडून फक्त अनामत रक्कम १५०० हि फोन कंपनी कडून घेण्यात येत आहे जी तुम्हाला नंतर परत मिळेल. २.४ इंच स्क्रीन, ५१५ mb Ram व ४ जीबी मेमरी हि आहे या फोनची विशेषतः महिन्याला १५३ रुपयात तुम्हाला अनलिमीटेड calling व नेत वापरता येणार आहे. तसेच आठवड्याकरिता ५४ रुपये व दोन दिवसाकरिता २४ रुपयाचा plan देखील आहे.

सप्टेंबर महिन्यापासून जिओ फोनचे वाटप सुरु होणार आहे. बुकिंग नुसार फोनच्या वाटपास प्राधान्य राहणार आहे.

तर बघा कसा करायचा फोन बुक

एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर असे करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल.

सर्वप्रथम जिओ कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जा https://www.jio.com/

क्लिक करा Keep Me Posted
त्यानंतर एक form उघडेल. त्या मध्ये संपूर्ण माहिती योग्य भरा.
तुम्ही My Jio App वरून सुध्दा याच पद्धतीने Order करू शकता.
५०० रुपये भरून तुम्ही जिओ फोन बुक करू शकता. उरलेले १००० रुपये Delivery वेळेस द्यावे लागतील. ३६ महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे परत मिळतील.

मेसेजवर बुक करा

जर तुम्हाला दुकानांमध्ये रांगेत उभं रहायचं नसेल तर तुम्ही घरबसल्याही जिओ फोन बुक करु शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एक मेसेज करावा लागेल. यासाठी मेसेज बॉक्समध्ये जाऊन ‘JP<> तुमचा पिनकोड<> जवळच्या जिओ स्टोअरचा कोड’ 7021170211 या क्रमांकावर पाठवावा लागेल. मेसेज पाठवताच तुम्हाला Thank You असा रिप्लाय येईल.( ज्या ग्राहकाला जिओ फोन खरेदी करायचा आहे, त्याला जिओ स्टोअरचा कोड आवश्यक आहे. तो कोड आपल्या नजीकच्या जिओ स्टोअरकडून दिला जाईल, जिथे जिओ फोन उपलब्ध असेल.)

ऑफलाईन फ्री बुकींग

आपल्या जवळच्या जिओ रिटेलरकडे जा. त्यांना आपण आपल्या आधारकार्डची एक फोटो देऊन बुकिंग करू शकता.

जीओ सिमकार्डने टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर आता रिलायन्स जीओचा हा ‘स्वस्त आणि मस्त’ फोन बाजारात आला आहे. या माध्यमातून देशभरातील ५० कोटी मोबाईल फोन यूजर्सपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आठवड्याला ५० लाख फोन विकण्याचे लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे.

Comments 2

  1. Sandeep says:

    like it

  2. raju says:

    I intrest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.