चित्रपटाच्या शुटिंगनंतर कलाकारांच्या कपड्यांचे काय केले जाते ?

भारतात दरवर्षी हजारो चित्रपट बनवले जातात. आपल्या देशातील लोकांना चित्रपटांची किती आवड आहे यावरुनच समजते. आपल्या अवतीभवतीच्या लोक अनेकदा चित्रपटाच्या संबंधीने गप्पा मारताना आढळतात. चित्रपटातील कलाकारांच्या हेअरस्टाईल, वागण्या-बोलण्याची नक्कल करताना दिसतात. त्यात दाखवल्याप्रमाणे प्रेम करायला आणि व्यक्त करायला शिकतात. अनेकांनी तर चित्रपटातल्यासारखेच स्टंट करताना हातपाय मोडून घेतले आहेत.

यामध्ये चित्रपटातील कलाकारांच्या कपड्यांविषयीही लोकांना कौतुक असते. कलाकारांनी घातलेल्या कपड्यांची फॅशन बनते. कुठल्या कलाकाराने कुठल्या चित्रपटात कोणते कपडे घातले होते, इथपर्यंत लोकांना माहित असते; पण कलाकारांनी चित्रपटात घातलेल्या कपड्यांचे पुढे काय होते हे बऱ्याचजणांना माहित नसते. आज आम्ही तुम्हाला तिवषयीच सांगणार आहोत…

शूटिंग झाल्यांनतर कलाकारांच्या कपड्यांचे काय केले जाते ?

१) पुनर्वापर : साधारणपणे कलाकार प्रत्येक चित्रपटाच्या वेगवेगळ्या सीनमध्ये वेगवेगळे कपडे वापरतात. परंतु काही प्रोडक्शन हाऊस भविष्यात पुनर्वापरासाठी कलाकारांचे कपडे जतन करुन ठेवतात. जतन केलेले कपडे गरज पडल्यास ज्युनिअर आर्टिस्टला वापरायला दिले जातात.

२) डिझाइनर : जेव्हा सेलेब्रिटी कलाकार कुठल्या चित्रपटासाठी डिझाइनर नेमतात, तेव्हा शूटिंगनंतर डिझाइनर कलाकारांचे कपडे त्यांच्यासोबत घेऊन जातात. ३) पुनर्रचना : काही प्रोडक्शन हाऊस चित्रपटात वापरलेल्या कपड्यांना नव्याने डिझाईन करुन पुन्हा नव्या कपड्यांसारखे वापरतात.

४) लिलाव : गाजलेल्या चित्रपटातील खास कपड्यांचा कधी कधी लिलाव देखील केला जातो. त्या लिलावातून आलेले पैसे सेवाभावी संस्थांना दिले जातात. ५) भेट : काही प्रोडक्शन हाऊस चित्रपटात वापरलेले कपडे आठवण म्हणून कलाकार किंवा चित्रपटाच्या टीममधील एखाद्या व्यक्तीला भेट देतात.

६) विक्री : काही गाजलेल्या चित्रपटातील कलाकारांच्या कपड्यांची मोठ्या किमतीत विक्री केली जाते. त्यातून आलेले पैसे सेवाभावी संस्थांना दिले जातात. ७) कलाकार : चित्रपटात काम केलेले कलाकार देखील कधीकधी आठवण म्हणून वापरलेले कपडे स्वतःकडे ठेवतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.