अनेक चित्रपट कलाकारांच्या शाही विवाहाच्या बातम्या आपण मीडियात अनेकदा बघितल्या असतील. आपल्या आवडत्या कलाकारांच्या लग्नाबद्दल त्यांच्या चाहत्यांना खास आकर्षण असते. परंतु बॉलिवूडमध्ये असेही अनेक सेलेब्रिटी आहेत ज्यांच्या लग्नाबद्दल कसल्याही बातम्या आपल्या वाचनात किंवा पाहण्यात आल्या नाहीत. या सेलिब्रिटींच्या चाहत्यांना जेव्हा त्यांच्या लग्नाची बातमी समजली, तेव्हा अनेकांना विश्वास बसला नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते सेलेब्रिटी ज्यांनी केले होते गुपचूप लग्न…
१) रेखा आणि विनोद मेहरा :
रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाविषयी असे सांगिले आई की, विनोद मेहरा रेखासोबत लग्न करण्यासाठी आपल्या आईला राजी करु शकले नव्हते. जेव्हा ते कोलकातामध्ये रेखासोबत लग्न केल्यानंतर विमानतळावरुन थेट आपल्या घरी घेऊन गेले आणि रेखाने विनोद मेहरांच्या आईचे चरण आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आईने रेखाला धक्का दिला. विनोद मेहराने कित्येकदा प्रयत्न करुनही त्याच्या आईने रेखाला स्वीकारले नाही आणि शेवटी दोघांचे नाते तुटले.
२) जॉन अब्राहम आणि प्रिया रुचाल :
जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्यातील प्रेम प्रकरण खूप चर्चेत होते, परंतु त्यांच्या लग्नाची कुणालाच खबर मिळाली नाही. अब्राहमने प्रिया रुचाल हिच्यासोबत लग्न केल्याची बातमी बऱ्याच कालावधीनंतर समोर आली. जॉन प्रियाला आजही मीडियापासून खूप दूर ठेवतो.
३) जुही चावला आणि जय मेहता :
जुही चावला बराच काळापर्यंत जय मेहताला आपला चांगला मित्र सांगत राहिली. बऱ्याच काळानंतर हे उघड झाले की हे दोघे नवरा-बायको आहेत. म्हणजेच या दोघांनी गुपचूप लग्न केले होते. जेव्हा ही गोष्ट चाहत्यांना समजली त्यावेळी जुही चावला गर्भवती होती. जुहीचे इतर कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्यासोबत नाव चर्चेत आले नाही.
४) दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला :
अकल्पितपणे जग सोडून गेलेल्या दिव्या भारतीने निर्माते साजिद नाडियाडवालाशी लग्न केले होते. पण हे लग्न अगदी गुप्तपणे झाले होते. त्यांच्या लग्नाबद्दल केवळ काही ठराविक मित्रांनाच माहिती होती. लग्न होऊन सहा महिने झाल्यानंतर रहस्यमय परिस्थितीत दिव्याचा मृत्यू झाला.
५) धर्मेंद्र आणि हेमा मालिनी :
धर्मेंद्र आणि ह्मा मालिनी हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले जोडपे होते. परंतु त्यावेळी धर्मेंद्र दोन मुलांचा बाप होता. अशामध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनीने एक मार्ग काढला. त्यांनी इस्लाम धर्म स्विकारुन कुणालाही न सांगता लग्न केले. त्यांना इशा नावाची मुलगी झाली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.