आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीचे लहानपनचे फोटो बघण्यास अनेक चाहत्यांना आवडते. काही विशेष प्रसंगी असे जुने फोटो सोशल मिडीयावर झपाट्याने वायरल होताना आपल्याला दिसतात. नुकताच असा फोटो एक समोर आलेला आहे ज्या अभिनेत्रीच्या अभिनयाची स्तृती सर्वत्र होते.
४ नोव्हेंबरला या अभिनेत्रीचा वाढदिवस झाला आणि या प्रसंगी हा फोटो तिने स्वतः तिच्या सोशल मिडिया खात्यावरून वायरल केला आहे. याच फोटो सोबत तिच्या बहिणीने अजून एक जुना फोटो आपल्या खात्यावरून अपलोड केला तो देखील वायरल झाला आहे.
तिची बहिण अभिनेत्री फराह नाज़ हि आहे. आता आपल्याला ओळखू आलेच असेल कि हि अभिनेत्री कोण आहे. ज्यांना अजूनही माहिती नाही त्यांच्या करिता आणखी एक हिंट देत आहो. या अभिनेत्रीचे वय ४८ वर्ष झाले असून ती आणखी देखील अविवाहित आहे.
एक संवेदनशील अभिनेत्री आणि कोणत्याही भूमिकेला तितक्याच ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावले आहे. 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तबस्सुम फातिमा हाश्मी असे आहे. म्हणजेच तब्बू
तब्बूने हिंदीसह तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृ्ष्टीमध्ये देखील काम केले आहे. आता पर्यंत दोन वेळा तब्बूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बूने वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. तिचा ‘हम नौजवान’ हा पहिलावहिला चित्रपट आहे. या चित्रपटात देवानंद मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या मुलीची भूमिका तब्बूने वटवली होती.
८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री फराह नाज तिची थोरली बहीण आहे. अभिनेत्री शबाना आझमी आणि बाबा आझमी यांची ती भाची आहे. फिल्मी बॅकग्राऊंड असल्याने तब्बूची बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती.
फोटो बघितल्यावर आपल्याला हे लक्षात येईल कि तब्बू सेम टू सेम आपल्या आईसारखी दिसते. या वाढदिवसाला तिचा हा फोटो सर्वत्र वायरल होत आहे. तब्बू बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे, जिच्या नावे रेकॉर्ड अवॉर्ड्स आहेत.
तिने फिल्मफेअरमध्ये आतापर्यंत चार उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) पुरस्कार मिळवले आहेत. शिवाय तिने पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर आणि उत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीचे 2 राष्ट्रीय पुरस्कार नावी केले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.