कोरोना प्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत चालणार आहे. लॉकडाऊन दरम्यान अशा अनेक किस्से समोर येत आहेत. कुणाचे लग्न रखडले आहे, कोण गुपचूप लग्न करत आहेत तर कुणाचे संसार मोडत आहेत.
प्रत्येकाच्या आपापल्या कहाण्या आहेत. अशातच उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक किस्सा घडला आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना अन्नदान करणाऱ्या एका तरुणाला फुटपाथवर भीक मागणाऱ्या एका मुलीशी प्रेम झालं आणि त्या दोघांनी चक्क लग्न केले. पाहूया काय आहे प्रकरण…
कोण आहेत ते दाम्पत्य आणि कसे झाले दोघांचे लग्न ?
ही कहाणी उत्तरप्रदेशच्या कानपुर जिल्ह्यातील बुध आश्रम येथील आहे. त्याठिकाणच्या नीलम नावाच्या मुलीला वडील नाहीत आणि आईला पॅरालिसिस झाला आहे. तिच्या भावाने आणि वहिनीने दोघांना मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. एका बाजूला लॉकडाऊन आणि दुसऱ्या बाजूला आईची जबाबदारी अशा कात्रीत ती सापडली होती. त्याचकाळात एका फुटपाथवर अन्नदान सुरु असल्याची बातमी तिला समजली आणि नीलम भुकेल्या आईसाठी अन्न आणण्यासाठी त्याठिकाणी भिकाऱ्यांच्या लाईनमध्ये जाऊन उभी राहिली.
अनिल नावाचा एक ड्रायव्हर मुलगा आपल्या मालकांना घेऊन भिकाऱ्यांना अन्नदान करण्यासाठी रोज त्याठिकाणी यायचा. यादरम्यान अनिलने नीलमला पहिले आणि त्याने तिचा पूर्वेतिहास जाणून घेतला. नीलमचे दुःखद अनुभव ऐकल्यानंतर अनिलला तिच्यावर प्रेम झाले. त्यानंतर अनिल जेव्हा लोकांना जेवण वाटून परत यायचा तेव्हा आपल्या मालकासोबत नीलमविषयी बोलायचं. मालकाने अनिलच्या मनातील भावना ओळखल्या. त्यांनी अनिलच्या वडिलांना लग्नासाठी राजी केले. लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंसिन्गचे पालन करत दोघांचे लग्न पार पडले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.