देशभरात 1 नोव्हेंबरपासून अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या नियमांबाबत जागरुक राहणे गरजेचे असून, या नव्या बदलांमुळे अनेकांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
नव्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेल्यापैकी बँकेतील व्याजदर, डिजिटल पेमेंट, बँकांची कार्यालयीन वेळ यासह एअरसेल सेवा बंद यांचा समावेश आहे. त्यामुळे या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम होणार आहे. या बदललेल्या नियमांमुळे थोडा त्रास सहन करावा लागू शकतो.
देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची वेळ एकच असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या जून महिन्यात यासंदर्भात बँकिंग विभागाने बैठकही घेतली होती. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँका उघडण्याची वेळ ठरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
एसबीआय ने या आधी 9 ऑक्टोबरला घोषणा केली होती, की 1 लाख रुपयांपासून डिपॉझिटवर व्याजदर 0.25 टक्के घटवून 3.25 टक्के करण्यात आलं आहे. तसेच 1 लाखांहून जास्त डिपॉझिट केलेली रकमेवरच्या व्याजाला रेपो रेटशी जोडण्यात आलं आहे.
अर्थ मंत्रालयाने 1 नोव्हेंबरपासून पेमेंटसंदर्भात काही नियम बदलले आहेत. ग्राहक किंवा मर्चेंट्स यांच्याकडून डिजिटल पेमेंटवर कोणताही कर लागणार नाही अथवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान हा नियम 50 कोटींपेक्षा जास्त टर्नओवर असणाऱया कंपन्यांना लागू आहे. इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर करून पेमेंट केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
यासोबतच सार्वजनिक बँकांच्या वेळापत्रकातही बदल होणार आहेत. नव्या वेळापत्रकानुसार, निवासी क्षेत्रातील सर्व बँका सकाळी 9 वाजता उघडतील आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज सुरु राहील. तर व्यापारी क्षेत्रातील वर्गासाठी बँकांची कामकाजाची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर उर्वरित सर्व बँका सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील.
1 ऑक्टोबरपासून एसबीआय बँकेच्या नियमात काही बदल करण्यात आले होते. एसबीआय यांच्या नियमांनुसार, आता ग्राहकांना 25,000 रूपयांपर्यंत सेव्हिंग असणार्यांना 8-10 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत. तर एसबीआयच्या एटीएममधून केलेले सारे व्यवहार हे मोफत आहेत. मात्र इतर बॅंकेच्या एटीममधून पैसे काढल्यास मेट्रो सिटीमध्ये 5 आणि इतर शहरांमध्ये 3 मोफत ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com वर पाठवू शकता.