हि निवडणूक गाजवली आयाराम आणि गायारामानी यामध्ये अनेकांचा पराभव झाला तर काही जणांनी आपल्या संधीचे सोने केले. परंतु आता अश्या एका नेत्या विषयी बघू ज्यांनी १५ दिवसात आपले पक्ष बदलाचे त्रिचक्र पूर्ण केले आहे.
बाळासाहेब सानप हे २० ते २२ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. महापालिकेवर भाजपला सत्ता मिळवून देण्यात शहराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण ठरले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता.
आणि आता बाळासाहेब सानप यांनी तीन आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आहे. विधानसभा पराभवानंतर लगेच हातात शिवबंधन बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्रचारादरम्यान सेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या भेटीचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हाती दमदार नेता लागल्याचे सांगण्यात येत असून, याचा नाशिक महापालिका राजकारणावर परिणाम होणार आहे.
जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अगदी काही दिवसांपर्यंत विश्वासू समजले जाणारे सानप आणि महाजन यांच्यात बिनसल्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीत सानप यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या सानप यांनी लगोलग राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली होती.
आत्ता पर्यंत समाजकारण आणि राजकारण करत असताना आपल्याला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. मी कोणत्याही पक्षात असलो तरी माझी चांगले संबंध शिवसेनेशीच होते, भाजप शिवसेना युती झाल्यामुळे आपल्याला तिकीट मिळू शकले नाही, असे सानप यांनी शिवबंधन बांधल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवायला विसरू नका.