भारतीय क्रिकेट खेळाडू आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यातील लग्न ही काय नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही अशा अनेक जोड्या लोकांनी पाहिल्या आहेत आणि अलीकडच्या काळात त्यात वाढ झाली आहे. विद्यमान भारतीय संघातही असे खेळाडू आहेत ज्यांनी अभिनेत्रींनशी लग्न केले आहे.
कॅप्टन विराट कोहली असो, ऑलराऊंडर हार्दिक पंड्या असो किंवा जबरदस्त बॅट्समन मनीष पांडे असो; या तिघांनी अभिनेत्रींनशी संसार थाटला आहे. विराट कोहलीने डिसेंबर २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले. मनीष पांडेने २०१९ मध्ये तमिळ अभिनेत्री आश्रित शेट्टीसोबत सात फेरे घेतले तर हार्दिक पंड्याने २०२० च्या सुरुवातीला बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिक सोबत साखरपुडा उरकला. आता या साखळीत टीम इंडियाच्या आणखी एका क्रिकेटरचे नाव जोडले जाणार आहे आणि तेही ‘ब्लॉकबस्टर’ बाहुबली चित्रपटाची नायिका देवसेना (अनुष्का शेट्टी) हिच्यासोबत…
वास्तविक पाहता अनुष्का शेट्टीचे नाव कोणाशी जोडले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी बाहुबली चित्रपटाचा नायक प्रभास सोबत तिचे नाव जोडले गेले होते. परंतु अनुष्का आता एका भारतीय क्रिकेटरसोबत रिलेशनमध्ये असुन त्याच्यासोबत लग्नाच्या तयारीत असल्याचीही बातमी आहे. मात्र या भारतीय क्रिकेटपटूचे नाव अद्याप समोर आले नाही. हाती मिळालेल्या माहितीनुसार टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू उत्तर भारतातील आहे. अनुष्का शेट्टीने अद्याप याबाबतीत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला आपल्याकडील खास माहिती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.