डॉक्टर बाबा आमटे- भारतातील एक अग्रगण्य समाजसेवक
कुष्ठरोग्यांसाठी देवदूत किंवा मासिहा असे बाबांना संबोधले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.आधुनिक पिढीसमोर मुरलीधर देविदास आमटे उर्फ बाबा आमटे यांनी एक निस्वार्थी वृत्तीचा एक अजोड आदर्श प्रस्थापित केला आहे.
नोबेल पारितोषिक वगळता बाकी बहुतेक सर्व राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पुरस्काराने बाबांना गौरविण्यात आले आहे.मानवतावादी व पर्यावरणविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण, टेंपलटन पुरस्कार, गांधी शांती पुरस्कार इत्यादी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
महाराष्ट्रात सन १९४८ रोजी स्थापन केलेल्या आनंदवन आश्रम येथे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी पुनर्वसन तसेच त्यांचे सक्षमीकरण सुरू केले. अवघ्या १४ रुपये व ६ कुष्ठरोगीवर सुरू झालेल्या ह्या आश्रमाचे रूपांतर आज २५० एकरभर मध्ये पसरले गेले आहे. सरकार द्वारा ह्या आश्रमास दरवर्षी २० कोटींपेक्षा जास्त उपचार करण्यास निधी दिला जातो.
ज्यांना काही कारणास्तव अस्पृश्य मानल्या गेले व कुष्ठरोगी यांची संख्या आश्रमात सध्या जवळपास ५००० एवढी पोहोचली आहे. कुष्ठरोगाने बरे झालेले तसेच स्वयंसेवी जे आश्रमाच्या देखरेखीसाठी तसेच आश्रमाच्या सोयीसुविधे साठी मीठ,पेट्रोल व साखर वगळता सर्वांचे उत्पादन आश्रमात होते. बाबा आमटेंच्या तीन पिढ्या रूग्णांच्या सेवेसाठी अगदी मन ओतून व निष्ठेने सेवा करत आहे. बाबांचा नावलौकिक सर्वदूर आहे पण काही त्यांच्याबद्दल काही न माहीत असलेल्या गोष्टी आपण खासरेवर जाणून घेऊ.
‘बाबा’ ही त्यांना दिलेली उपाधी नसून बालपणीचे टोपणनाव आहे.
बऱ्याच जणांना वाटते की बाबा ही त्यांना त्यांच्या सत्कर्मामुळे मिळालेली पदवी आहे पण प्रत्यक्षात हे नाव त्यांचे बालपणी दिलेले टोपणनाव आहे.त्यांच्या कर्मामुळे ते आज एक असामान्य बाबांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.
बाबांनी इंग्लंडवरुन बॅरिस्टर ची पदवी प्राप्त केली आहे.
त्यांचा जन्म गर्भश्रीमंत ब्राह्मण कुटुंबात झालेल्या.त्यामुळे त्यांना भौतिक सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या.आपले बॅरिस्टर चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भरतात परतले व त्यांनी इथेच सराव चालू केला.
ते एक स्वातंत्र्यसेनानी होते.
महात्मा गांधींच्या “राष्ट्रीय चळवळीला”प्रेरित होऊन त्यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीला पूर्णविराम दिला व त्या चळवळीत मोठ्या हिरहिरीने सहभागी झाले.त्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
त्यांनी आपल्या संपत्तीचा त्याग केला.
भौतिक संपत्ती तसेच सुखसोयींचा बाबांच्या दृढविश्वास व प्रचंड इच्छाशक्ती समोर काहीच परिणाम झाला नाही.अखेर त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला आणि त्यांनी आपले आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवसुश्रुषा करण्यात झोकून दिले.त्यानी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा केली.
बाबा आमटे हे नास्तिक होते.
समानतेवत बाबांचा विश्वास होता.अनिष्ठ रूढी-प्रथा,तसेच चालीरिती च्या विरोधात ते होते त्यामुळेच कोणत्याही देवी देवतांचे ते पूजा वगैरे करत नसत.
महात्मा गांधींचे अखेरचे अनुयायी म्हणून बाबा आमटेंना गणले जाते.
वर्धामधील आश्रमात महात्मा गांधींनी अनेक कुष्ठरोगीचे इलाज केले. बाबा आमटे यांना महात्मा गांधींचे शेवटचे खरे अनुयायी मानले जात असे. महात्मा गांधी यांनी कुष्ठरोग्यांसाठी चिंता व्यक्त केली होती कारण त्यांनी अनेक वर्धा आश्रमांत त्यांची काळजी घेतली. गांधीजींच्या मूल्यांविषयी दृढ विश्वास आणि स्वयंपूर्ण गावांच्या संकल्पनेच्या धर्तीवर त्यांनी आनंदवनात हा प्रयोग केला. आनंदवनात बनलेल्या खादीचा त्यांनी अखेरपर्यंत वापर केला.
‘भारत जोडो अभियान’ साठी देशव्यापी मोर्चाचे आयोजन करून त्यांनी आजारी दिन दुबळ्यांच्या समस्यांना आव्हान दिले.
त्यांनी १९८५ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर असा मोर्च्यांचे आयोजन करून युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्ती, समानता बंधुता तसेच सर्वांचे एकत्रीकरण या हेतूने आयोजन केले.मोर्च्यां दरम्यान बाबा आजारी पडूनसुध्दा मोर्चा न थांबवता बस मध्ये झोपून तो मोर्चा पूर्ण केला यावरूनच त्यांच्या विलक्षण इच्छाशक्तीचे दर्शन घडते.१९८८मध्ये पुन्हा एकदा गुजरात ते अरुणाचल प्रदेश असा एक मोर्चा काढला,त्याचा मूळ उद्देश हा पर्यावरणबद्दल जागरूकता तसेच शांतता प्रस्थापित करणे हा होता.
अभय सहादक – एक निडर सत्य साधक
ब्रिटीशांद्वारे मुलीची होणारा छळामधून जेव्हा बाबांनी त्या मुलीला वाचविले तेव्हा त्यांना महात्मा गांधीद्वारे सन्मानित करण्यात आले. कालांतराने त्यांनी कुष्ठरोगिं साठी बॅसिली नामक लस चे संशोधन करून उपचार चालु केले.म्हणुनच गांधींनी दिलेले ती उपाधी त्यांना अत्यंत समर्पक आहे असे वाटते.
१९४८ मध्ये महारोगी सेवा समितीची स्थापना केली.
एका समितीची स्थापना करून आनंदवनात त्यांनी अस्पृश्य, दलित व महारोगी करिता सेवा समिती स्थापन केली. स्वित्झर्लंड मधील नुव्हॅलें प्लॅनेट चे खास सहकार्य लाभले. त्यानी बाबांना सहकार्य करण्यास सुरुवात केली. युरोपियन विद्यार्थ्यांचे दौरे अयोजूत करून त्यांनी आनंदवनात बांधकाम करण्यात हातभार लावला.
मानवतावादी वृत्ती बघून त्यांनी सध्या भोळ्या साधनाताई सोबत विवाह केला.
तारुण्यात बाबांनी एक लग्नसमारंभात ताईंना एका वृद्ध चाकाराला मदत करताना बघितले व त्याच क्षणी त्यांनी साधना ताई सोबत लग्न करायचे ठरविले. काही दिवसानंतर बाबांनी घरच्यांना ताईबरोबर लग्नाबद्दल विचारले व १९४६ मध्ये त्यांनी विवाह केला. बाबांबरोबर त्या प्रत्येक सामाजिक क्षेत्रात सहकार्य करीत असत.वयाच्या ९५ व्या वर्षी २००१ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नर्मदा बचाव आंदोलनात ते अग्रस्थानी होते.
नर्मदा धरण पाण्याने डूबल्यानंतर जनजागृती करणार्या जमातींची ओळख पटविण्यासाठी बाबा आमटे यांनी त्यांच्यासोबत राहण्याची निवड केली. त्यांनी नर्मदाच्या काठावर असलेल्या कासारवाडमधील निजावाड आश्रम बांधले आणि हजारो आदिवासी लोकांकरीता आंदोलन केले. त्यांनी असेही म्हटले की सरदार सरोवर धरणाच्या बांधणीमुळे पर्यावरणावर प्रतिकुल परिणाम होईल आणि त्यामुळे त्यांनी त्याचा तीव्र विरोध केला.
बाबांच्या ह्या अफाट कार्यामुळे भारावून गेलो- दलाई लामा
दलाई लामा बाबा आमटे यांचे प्रबळ प्रशंसक होते, त्यांनी ‘व्यावहारिक करुणा, वास्तविक परिवर्तन आणि भारत विकसित करण्यासाठी योग्य मार्ग’ म्हणून त्यांचे जीवनकार्य मांडले.
पुरस्कारातून मिळणारी सर्व रक्कम ही आनंदवन आश्रमाच्या विकासकामांत घालविली. कसलाही स्वार्थ न बाळगता बाबांनी आयुष्यभर पूरस्कारातून मिळालेली १.५ करोड रक्कम आनंदवनात दिली.
सेवा करण्याची इच्छा कायम जागृत ठेवली. बाबा आमटे आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला मूत्रपिंडाच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते.त्यांच्यावर २ मोठ्या शास्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ति च्या जोरावर अनेक आजारावर मात केली.
कर्करोगामुळे बाबांनी आपला अखेरचा श्वास ९ फेब्रुवारी २००८ रोजी आनंदवनात घेतला.त्यांनी आपला ९३ वर्षांचा वारसा प्रस्थापित केला.
बाबा आमटे यांच्या निस्वार्थ कार्याला खासरेचा सलाम
वाचा सिंधुताई सपकाळ यांचा जीवन संघर्ष
Leave a Reply