पावसाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या ४ ठिकाणी जाणं टाळा!

पावसाळ्यात अनेकांना फिरायला जाण्याची हौस असते. पावसाळ्यात वातावरणातील गारवा अनुभवण्याचं सुख वेगळंच असतं. अनेकजण पावसाळ्यात फिरण्यासाठी मान्सून ट्रिप प्लॅन करत असतात. भारतातील अनेक ठिकाणं या दिवसांमध्ये हिरवी शाल पांघरल्याप्रमाणे दिसतात. सध्या पावसाचा जोर सर्वत्र चांगलाच वाढला आहे. त्यामुळे घराबाहेर पडणं देखील अवघड झालंय.

पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करण्याअगोदर सर्व गोष्टींची माहिती घेणं महत्वाचं आहे. पावसाळ्यात कुठेहि जायचा प्लॅन करत असाल तर तिथे जाण्यात काही रिस्क आहे का याची माहिती घ्या. आणि या ठिकाणांना पावसाळ्यामध्ये भेट देणं शक्यतो टाळाच. पावसाळ्यात फिरायला जायचं असेल तर या चार ठिकाणी जाणं टाळाच..

१.मुंबई-

पावसाळयात मुंबईत फिरायला चुकूनही जाऊ नका. सध्या तुम्ही मुंबईची काय स्थिती आहे ते बघितलंच असेल. मुसळधार पावसामुळे अनेकदा मुंबापूरीची तुंबापूरी होते. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचतं. ज्यामुळे संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत होतं. ट्रॅफिकची समस्या देखील मोठ्या प्रमाणात जाणवते. त्यामुळे तुमचा फिरण्याच्या आनंदावर विरझण पडू शकतं.

२.चेन्नई-

चेन्नईमध्ये देखील पावसामुळे फिरणं कठीण होतं. या शहराची स्थिती हि पावसाळ्यात मुंबईसारखीच असते. येथील जनजीवन देखील पावसामुळे खूपदा विस्कळीत होतं. त्यामुळे मान्सून ट्रिपचा प्लॅन करत असाल तर चेन्नईचा विचार करू नका.

३.उत्तराखंड-

उत्तराखंडची ढगफुटीची आठवण आपण सर्वाना आहे. येथे पावसाळ्यामध्ये ढगफुटी आणि लँन्डस्लाइडसारख्या अत्यंत गंभीर आणि नैसर्गिक आपत्तीजनक घटना घडत असतात. उत्तराखंड पावसामुळे सर्वाधिक प्रभावित होणारं एक क्षेत्र आहे. येथील सर्वाधिक रस्ते डोंगर पोखरून तयार करण्यात आलेले आहेत. अशातच पावसाळ्यामध्ये येथे अनेक अपघातही होत असतात.

४. सिक्कीम-

सिक्कीमचे सौंदर्य हे आपणाला भुरळ घालू शकते. पण पावसाळ्यात मात्र येथे जाणे जिकरीचे ठरू शकते. पावसाळ्यात येथील सौंदर्य तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यामुळे मान्सून ट्रिप प्लॅन करताना येथील परिस्थितीचा अंदाज घेऊनच या ठिकाणाचा विचार करा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.