१६ मार्चपासून एटीएम मधुन पैसे काढण्याच्या नियमांत होणार बदल, या ठिकाणी नाही चालणार ATM

१६ मार्च २०२० पासून एटीएम कार्डद्वारे पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम आणि क्रेडिट कार्ड्सद्वारे चालणारे पैशांचे व्यवहार अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने नवीन नियम आणण्यात आले आहेत. त्यासोबतच आपल्या खात्यात असणारे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठीही हे नवीन नियम फायदेशीर आहेत. यापूर्वीही १ जानेवारी २०२० पासून एसबीआयने एटीएम मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केले होते. आता एसबीआय एटीएममधुन रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पैसे काढायचे असतील तर तुम्हाला बँकेतील नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला OTP सांगावा लागणार आहे. हा नवा नियम दहा हजार रुपयांहुन अधिकच्या रोख व्यवहारांना लागू आहे.

१६ मार्च २०२० पासुन लागू होत आहेत हे नवीन नियम

(१) आरबीआयच्या नव्या नियमानुसार एटीएम आणि पीओएस केंद्रावर फक्त देशांतर्गत कार्डेद्वारे होणाऱ्या ट्रांझॅक्शन परवानगी दिली जाणार आहे. ज्या लोकांचे परदेशात जाणे-येणे नसते, त्यांच्या बँक कार्डवर ओव्हरसीज (परदेशी) सुविधा उपलब्ध होणार नाही. जर ग्राहकांना आपल्या बँक कार्डवर परदेशातील ट्रांझॅक्शन, ऑनलाइन ट्रांझॅक्शन आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांझॅक्शन सेवा हव्या असतील, तर त्याला त्या स्वतंत्रपणे घ्याव्या लागतील.

(२) सध्या ज्या लोकांकडे बँक कार्ड आहेत त्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्यायचा आहे की त्यांना त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्ड व्यवहार सुरु ठेवायचे आहेत की बंद करायचे आहेत. अक्षम करायचे की नाही. म्हणजेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड देखील बंद करु शकता. ज्या कार्ड्समध्ये अद्याप ऑनलाइन / आंतरराष्ट्रीय / कॉन्टॅक्टलेस ट्रांझॅक्शन झाले नाहीत अशा कार्डमधील या सुविधा बंद करणे बंधनकारक असेल.

(३) ग्राहक २४x७ कधीही त्यांचे कार्ड चालू किंवा बंद करु शकतात. तसेच आपल्या ट्रांझॅक्शन लिमिटमध्ये बदल करु शकतात. यासाठी ते मोबाइल अ‍ॅप किंवा इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम किंवा आयव्हीआरचा उपयोग करु शकतात.

(४) आता बँकांना त्यांच्या ग्राहकांना पीओएस / एटीएम / ऑनलाइन व्यवहार / कॉन्टॅक्टलेस यापैकी कुठल्याही ट्रांझॅक्शनच्या मर्यादेमध्ये बदल करण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. तसेच बँक कार्ड स्विच ऑफ किंवा स्विच ऑन करण्याची सुविधाही द्यावी लागेल.

(५) आरबीआयचे नवीन नियम प्रीपेड गिफ्ट कार्ड आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.