मराठी सिनेविश्वातील गाजलेलं नाव म्हणजे निवेदिता सराफ ! माझा छकुला, दे दणादण, धुमधडाका, अशी ही बनवाबनवी अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांतून निवेदिता सराफांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन, हिंदी टेलिव्हिजन अशा वेगवेगळ्या माध्यमातून निवेदिताने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मात्र ही आघाडीची अभिनेत्री गेल्या १४ वर्षांपासून सिनेविश्वपासून दूर होती. यामागे काय कारण होते ते आज आपण जाणून घेणार आहोत.
चित्रपट अभिनेत्री ते व्यावसायिक
मराठी चित्रपटातील आघाडीचे अभिनेते अशोक सराफ यांच्याशी लग्न झाल्यांनतर निवेदितांनी चित्रपटत काम करणे थांबवले. त्यानंतर निवेदिता व्यवसायाकडे वळल्या. निवेदिताला साड्यांची असल्याने त्यांनी नवनवीन साड्या, साड्यांचे विविध डिझाईन, रंग यामध्ये रस होता. सुरुवातीला आपली आवड जोपासण्यासाठी रेडिमेड साड्यांच्या विक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरु केला.
त्यानंतर त्यांनी स्वतःच साड्यांचे डिझाईन तयार करण्यास सुरुवात केली. “डिझाईन सारीज इन अफोर्डेबल रेट” हे ब्रीद घेऊन कमी किंमतीमध्ये दर्जेदार साड्या विकणे हा त्यांच्या व्यवसायाचा उद्देश होता. “हंसगामिनी” या ब्रँडनावाने त्यांनी आपल्या साड्या बाजारात आणल्या.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफांचा मुलगा काय करतो ?
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना अनिकेत नावाचा एक मुलगाही आहे. शक्यतो कलाकारांची मुलेही कलाकारच बनतात असा पायंडा आहे, परंतु अनिकेत सराफ त्याला अपवाद आहे. अनिकेतने मुंबईमधील दादरच्या केटरिंग कॉलेजमध्ये डिग्री घेतल्यानंतर फ्रान्सला जाऊन उच्चशिक्षण पूर्ण केले.
त्याने पाकशास्त्रात कौशल्य प्राप्त केले. भारतात परतल्यानंतर आपल्या विविध पाककृतींचे व्हिडीओ बनवून अनिकेत त्याच्या “गेट करिन्ड” नावाच्या युट्युब चॅनेलवरती शेअर करत असतो. त्याच्या युट्युब चॅनेलला १० लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत.