भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. भारतीय संघाने अगोदर टी-२० मध्ये वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आणि नंतर वनडे सिरीजमध्ये देखील वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यांनतर सध्या सुरु असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये देखील भारतीय संघाने पहिला सामना जिंकला असून दुसरा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर भारतीय संघ आहे.
टेस्ट सिरीजमध्ये भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. पण या दरम्यान भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघात सामील असलेल्या मोहमद शमीविरुद्ध अटक वारंट निघाला आहे.
मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमदविरोधात अलिपोर कोर्टाने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. १५ दिवसांचा अवधी त्याला सरेंडर होण्यास वा जामीन मिळविण्यास देण्यात आला आहे.
मोहम्मद शमी सध्या वेस्ट इंडिजविरोधात दुसरी आणि अंतिम कसोटी खेळत आहे. शमीने २०१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. अलीकडेच २०१८ मध्ये मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा भा. दं. वि. कलम ४९८ – अ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांचा वाद मागील वर्षापासून थांबण्याचे नाव घेत नाहीये. शमीच्या अडचणीत यामुळे चांगलीच वाढ झाली आहे. शमी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात जहाँने घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली होती. नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला.
हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.
शमी सध्या वेस्ट इंडिजविरोधात दुसरी आणि अंतिम कसोटी खेळत आहे. हा दौरा संपवून शमी भारतात परतल्यानंतर त्याला जामीन मिळतो का अटक होते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.