क्रिकेटला महान अनिश्चिततेचा खेळ मानले जाते. या खेळाच्या बाबतीत केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही काय होईल हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. क्रिकेट आणि सचिन तेंडुलकर हे अतूट नाते आहे. सचिनला तर क्रिकेटचा देवही मानले जाते.
कारण जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत सचिनने केलेले अनेक विश्वविक्रम अबाधित राहतील. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी सचिनने केली आहे. परंतु आज आपण साहिब नाही, तर त्याच्या मुलाच्या वेगळ्याच कामगिरीबद्दल बघणार आहोत.
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये उतरला आहे. अर्जुन हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. तो डावखुरा फलंदाज आणि चांगला गोलंदाज आहे. हे झालं अर्जुनच्या खेळाबद्दल, पण आता आपण त्याच्या लव्हस्टोरीबद्दल बघणार आहोत.
सध्या अर्जुन तेंडुलकर आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील बॅट्समन डॅनियल वॅट यांच्यातील वाढती जवळीक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्यामध्ये खूपच गाढ मैत्री झाली आहे.
अर्जुनचे वय २१ वर्ष असून डॅनियल २९ वर्षांची आहे. डॅनियल अर्जुनापेक्षा आठ वर्षांनी मोठी असली तरी दोघांच्या मैत्रीमध्ये वय आडवे आले नाही. हे सांगण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही देखील सचिनपेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर अर्जुन आणि डॅनियलचे अनेक फोटो येत आहेत ज्यामध्ये दोघे एकमेकांसोबत दिसत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा आहे.
डॅनियल वॅटने यापूर्वी भारताचा कॅप्टन विराट कोहली याला लग्नाची मागणी घातली होती. तिने ४ एप्रिल २०१४ रोजी ट्विटरवर “Kholi marry me” असे ट्विट करुन विराटला प्रपोज केले होते. परंतु विराटने तिला सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करु नकोस असे सुनावले होते. त्यानंतर विराट आणि अनुष्काची जोडी जमली आणि दोघांनी लग्न केले. आता अर्जुनच्या निमित्ताने पुन्हा एकदा डॅनियल चर्चेत आली असून पुढे काय होतंय ते पाहण्यासारखे आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.