लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अनेकजण तिकीट मिळवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करताहेत. तर सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षानेही आपल्या उमेदवारांच्या यादी जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी भाजपने दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारले असून, तरुण/नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे.
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या दिग्गजांनाही भाजपाने तिकीट नाकराले आहे. तिकीट नाकरलेल्या दिग्गजांच्या यादीमध्ये झारखंडमधील करीया मुंडा यांचाही समावेश आहे. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर आता आपण राजकारणातून संन्यास घेऊन, पुन्हा शेतीकडे वळणार असल्याचे करीया यांनी जाहीर केले आहे.
करिया हे झारखंडच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. ते लोकसभेचे माजी उपसभापती राहिले असून, आठ वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. मात्र भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये करीया यांच्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अर्जून मुंडा यांना तिकीट देण्यात आले आहे. या निर्णयामुळे करीया यांनी आता सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतर ते शेती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भाजपने तिकीट नाकारल्यानंतर करिया यांना यासंदर्भात विचारण्यात आले, तेव्हा “मी शेतकरी होतो. तेथून राजकारणात आलो आणि लोकसभेत निवडून गेलो. आता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मी पुन्हा शेती करणार आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो होतो. राजकारणात येण्यामागे वैयक्तिक फायदा घेण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. देवाने मला खूप काही दिली आहे.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.