पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहे चित्रपटाचे शीर्षक ! आणि शीर्षक हे कायमस्वरुपी असते (पीएम नव्हे !) नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर येणार हा चित्रपट आहे. एप्रिल महिन्यात तो रिलीज होत आहे. ऐन निवडणुकीच्या दरम्यान. यात विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका बजावत आहे. तो भूमिका करत आहे पण मोदींसारखा दिसत नाही. पण कोणी कोणासारखे दिसावे हे काय ग्रंथात लिहिले नाही. चला तर मुद्द्यावर येऊया या शेखी मिरवणाऱ्या गोष्टीवर इथे चर्चा का केली जात आहे.
वास्तविक जावेद अख्तर यांनी ट्विटरवर एक ट्विट केले आहे, त्यात त्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचा स्क्रीनशॉट टाकला आहे. या ट्विटच्या शेवटी क्रेडिट म्हणुन हा स्क्रीनशॉट टाकला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये ह्या चित्रपटाला कुणीकुणी कशाप्रकारे सहकार्य केले ते लिहले आहे. जावेद अख्तर यांनी यावर हरकत घेतली आहे. त्यांनी स्क्रीनशॉट टाकून त्यात म्हटले आहे कि चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांना गीतकार म्हणून श्रेय दिले आहे. परंतु त्यांनी या चित्रपटासाठी एकही गाणे लिहिले नाही. म्हणूनच त्यांना हे खोटे श्रेय मिळाले आहे. ट्वीट पहाः
यानंतर खात्री करण्यासाठी चित्रपटाचे ट्रेलर पाहिले. जरी परत एकदा ट्रेलर पहावा लागणं हे स्वतःमध्येच एक औत्सुक्याची गोष्ट असली तरी पुन्हा तो पाहून घेतला. पळवत पळवत अगदी शेवटच्या क्षणी जाऊन बघितलं तर समजलं की जावेद अख्तर यांचे म्हणणे खरे होते आणि ते मोदींविरूद्ध कोणत्याही चुकीच्या बातमीचा प्रसार करीत नव्हते. चित्रपटाच्या ट्रेलरमधील तो स्क्रीनशॉट पहा:
Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 22, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.