बॉलीवूड स्टार सनी लिओनीने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला आवडत्या खेळाडूबाबत वक्तव्य केले आहे. मला महेंद्रसिंग धोनी आवडतो, असे तिने या मुलाखतीमध्ये सांगितले. पण सनीला धोनी का आवडतो, हे तुम्हाला माहिती आहे का. खासरेवर जाणून घेऊया का आवडतो सनीला धोनी..
धोनी हा फिटनेसच्या बाबतीत भारतीय संघातील तरुण खेळाडूंना देखील मागे टाकतो. ३७ वर्षीय धोनीचा युवा खेळाडूला लाजवेल, असा फिटनेस आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून धोनीने आपला लौकिक कायम राखला आहे. काही दिवासांपूर्वी धोनीला विश्वचषकाच्या संघात खेळवायचे का, यावर बरीच चर्चा सुरु होती. धोनीवर बरीच टीकाही झाली. पण धोनीने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीकाकारांच्या तोंडाला कुलूप लावले.
नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शेवटच्या २ सामन्यात धोनी नव्हता. त्याची टीममध्ये चांगलीच कमी जाणवली. आता धोनी हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला आहे आणि त्याच्याशिवाय विश्वचषकात भारतीय संघ खेळू शकत नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे.
एका क्रिकेट वेबसाईटचे उद्धाटन सनीच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तिला, तुझा आवडता क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सनी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाचे तरी नाव घेईल, असे काही जणांना वाटत होते. पण सनीने क्षणाचाही विलंब न लावता धोनीचे नाव यावेळी घेतले.
सनी धोनीबद्दल म्हणाली की, ” धोनी हा एक फॅमिली मॅन आहे. धोनीचे मुलगी झिवा ही फारच क्यूट आहे. मी धोनी आणि झिवाचे काही फोटो पाहिले. फारच सुंदर त्या दोघांचे फोटो आहेत. त्यामुळे मला सर्व खेळाडूंमध्ये धोनी सर्वात जास्त आवडतो.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.