होळी किंवा रंगपंचमी ला आपण सर्वजण मागील पुढील कोणताही विचार न करता रंग खेळतो किंवा आपले मित्र व कुटुंबीय आपल्याला रंग लावतात. कधी कोरडा तर कधी ओला रंग लावल्या जातो. अशावेळी मोठा प्रश्न असतो तो म्हणजे हे रंग शरीरा वरून कसा काढायचा. तर आपण पाहूया रंग काढण्यासाठीचे हे घरगुती उपाय. या उपायांनी कोणतीही हानी न होता नैसर्गिकरित्या रंग निघाल्या जातो.
१)बेसन, लिंबू आणि दूध- बेसन, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट करा. रंग असलेल्या त्वचेवर ही पेस्ट लावा. १५-२० मिनीट ती पेस्ट तशीच राहू द्या आणि सुकल्यानंतर त्वचा स्वच्छ करा. त्वचा पूर्णपणे स्वच्छ होऊन रंग निघायला मदत होईल.
२)काकडीचा रस- होळीचे रंग काढण्याचा हा सर्वात सोपा व मस्त उपाय आहे. काकडीच्या रसात गुलाबजल आणि एक चमचा साईडर व्हिनेगर घालून मिश्रण तयार करा. रंग असलेल्या त्वचेवर ते लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा. यामुळे रंग गायब होऊन त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.
३)मुळ्याचा रस- होळीचे रंग काढण्यासाठी मुळ्याचा रस अतिशय फायदेशीर आहे. त्यासाठी मुळ्याच्या रसात बेसन आणि दूध मिसळा. त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा धुवा. यामुळे रंग निघण्याबरोबरच त्वचा कोमल व मुलायम होईल.
४)दुधात कच्च्या पपईचा गर- होळीचे रंग काढण्यासाठी तुम्ही हा उपायही करू शकता. यासाठी दुधात कच्च्या पपईचा गर घाला. त्यात मुलतानी माती आणि बदामाचे तेल घालून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहरा साफ करा. होळीचे घट्ट रंग निघतील.
५) दही व मध- दह्यात थोडं मध मिक्स करा. हा लेप चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मालिश करा. रंग सहजरित्या निघेल आणि रंगातील रसायनाचा त्वचेवर परिणाम होणार नाही. आणि हि प्रक्रिया नैसर्गिक असल्याने आपल्याला यापासून काही विप्रति परिणाम देखील होणार नाहीत.
आपल्याला हि माहीती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरु नका. आपल्याकडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडी वर पाठवु शकता.