गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल (दि. १७) निधन झालं. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांचं निधन झालं. मनोहर पर्रिकर एक असं व्यक्तीमत्व होतं ज्यांची साधेपणा हीच ओळख होती. ते चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, चारवेळा मुख्यमंत्री पद भूषवूनही त्यांनी कुठल्याही व्हीआयपी सुविधांचा कधीही उपभोग घेतला नाही. ते भारताचे पहिले असे मुख्यमंत्री होते ज्यांनी आयआयटीचं शिक्षण घेतलं होतं.
ते मुख्यमंत्री असूनही शासकीय निवासात राहायचे नाहीत. स्वतःच्या घरात कुटुंबियांसोबत राहणे ते पसंत करायचे. आपल्या पगारातून ते मुलांचा सांभाळ करायचे. त्यांच्या पत्नीने २००१ साली कर्करोगानेच निधन झाले होते. विधानसभेपर्यंत जाण्यासाठी ते मोठा फौजफाथा देखील टाळायचे. सरकारी गाड्या वापरणे देखील टाळायचे. कुठेही येण्या-जाण्यासाठी ते रिक्षा किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचे. विमानातून प्रवास करतानाही ते नेहमी इकॉनॉमी क्लासमधूनच प्रवास करायचे.
ते ऑफिसला जाण्यासाठी स्कुटर पसंत करायचे. स्कुटरवरच ते नेहमी ऑफिसला जायचे. रस्त्यात कुठेही थांबून ते एखाद्या साध्या हॉटेलमध्ये जेवायचे. त्यांना अनेकदा रस्त्यावर चहा पिताना देखील बघितलं आहे. त्यांना लोकं स्कुटरवाला मुख्यमंत्री म्हणून देखील ओळखायचे. त्यांच्या स्कुटरचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी काही काळापूर्वी स्कुटर चालवणे बंद केले होते. जाणून घेऊया काय होते यामागचे कारण.
मनोहर पर्रीकर यांनी स्कुटर चालवणे का बंद केले याचा खुलासा मागच्या वर्षी १२ जानेवारी २०१८ रोजी केली होता. गोव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना त्यांनी यामागचे कारण सांगितले होते. पर्रीकर म्हणाले, ‘मी आता स्कुटर नाही चालवत, कारण आता कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अनेकदा त्याच विचार करत असतो. अशात मी जर स्कुटर चालवत जर विचार करत राहिलो तर अपघाताचा धोका आहे. त्यामुळे स्कुटर चालवणे मी टाळतो.’
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.
हे हि वाचा- मनोहर पर्रिकरांना झालेला स्वादुपिंडाचा कर्करोग किती जीवघेणा असतो वाचा माहिती