न्यूझीलंडमधील साऊथ आइसलँड शहरात २ मस्जिदीत केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ निष्पाप व्यक्तींचे प्राण गेले. या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. क्राईस्टचर्च मधील आलं नूर मस्जिदीत हा हल्ला झाला. हा हल्लेखोर बंदूक घेऊन मस्जिदीत घुसला आणि गोळीबार केला. या व्यक्तीने या हल्ल्याचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या फेसबुक अकाउंटवर केले.
कोण आहे हा हल्लेखोर?
मीडिया रिपोर्ट्सनुसार या हल्लेखोराने १७ मिनिटं या हल्ल्याचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या फेसबुक अकाउंटवर केले. या व्यक्तीचे नाव ब्रेंटन टैरंट असल्याची माहिती समोर आली आहे. २८ वर्षीय ब्रेंटन टैरंट हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. या हल्लेखोराने अगोदर आपली कार डीन अवेन्यू मध्ये अल नूर मस्जिदीजवळ पार्क केली. त्यानंतर त्याने गाडीतून बंदूक काढली. आणि मस्जिदीत घुसून गोळीबार सुरु केला.
हा व्यक्ती आर्मीच्या ड्रेसमध्ये असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या गाडीत अनेक हत्यार असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तर त्याने २-३ वेळा बंदूक रीलोड केल्याचे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या हल्लेखोराने अगोदर एक ७४ पानांचे घोषणापत्र देखील जाहीर केले होते. यामध्ये त्याने लिहिले आहे कि, ‘ मी मुस्लिमांचा द्वेष करत नाही, पण त्या मुस्लिमांचा द्वेष करतो जे आमच्या जमिनीवर ताबा करून धर्म परिवर्तन करत आहेत.
कसा झाला हल्ला-
क्राईस्टचर्च शहर १५ मार्चच्या सकाळी या हल्ल्याने हादरले. दोन मस्जिदीत या बंदूकधाऱ्यानी अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला झाला तेव्हा ३०० पेक्षा अधिक लोकं मस्जिदमध्ये होते. धक्कादायक म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा बांगलादेशचा संपूर्ण संघ त्याच मस्जिदीत होता. मस्जिदीत सर्वत्र रक्ताचा सडा आणि मृतदेह पडलेले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.