सध्या सोशल मिडीयावर कराची मधील एका वृद्ध चहावाल्याचा फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये त्या वृद्धाने आपल्या चहाच्या गाड्यावर एक बॅनर लावलेला दिसत आहे आणि त्यावर उर्दु मध्ये काहीतरी वाक्ये लिहली आहेत. त्याच बॅनरवर भारतीय वायुसेनेचे जवान विंग कमांडर अभिनंदन यांचा चहा पितानाचा फोटोही लावलेला दिसत आहे. अधिक माहिती घेतली असता समजले की त्या वृद्धाने बॅनरवर उर्दुत लिहलेल्या वाक्यांचा अर्थ आहे की “असा चहा जो शत्रुला सुद्धा मित्र बनवतो…”
विंग कमांडर अभिनंदन यांचं विमान क्रॅश झाल्यानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी पकडुन मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तानी आर्मीच्या जवानांनी अभिनंदन यांना तिथून सोडवून आणलं आणि आपल्या ताब्यात घेतले. शिष्टाचार म्हणुन अभिनंदन यांना चहापाणी केलं.
अभिनंदन तिथे कैदेत असताना चहा पीत चर्चा करत असल्याचे व्हिडीओ नंतर पाकिस्तानी आर्मीच्या अधिकाऱ्यांनी प्रसारित केले होते. त्यानंतर जिनिव्हा करारानुसार पाकिस्तान आर्मीने विंग कमांडर अभिनंदन यांना दोनच दिवसात बभारतीय आर्मीच्या स्वाधीन केले होते. तेव्हापासुन विंग कमांडर अभिनंदन यांचे फोटो भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांतील बंधुभावाचे प्रतीक म्हणुन सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. अभिनंदन यांच्या शौर्याचे कौतुक पाकिस्तानातही केले जात आहे.
पाकिस्तानच्या कराची मधील खान टी स्टॉल नावाच्या चहाच्या गाड्यावर अभिनंदन यांचा फोटो असलेला बॅनर लावला आहे. आपल्या चहाची चांगली मार्केटिंग केली म्हणुन पाकिस्तानमधील नेटिझन्सही ट्विटरवर याचे कौतुक करताना आढळत आहेत. उमर फारुक नावाच्या व्यक्तीने सर्वात आधी ट्विटरवर हा फोटो शेअर केला होता.
Khan Tea Stall—Special tea that may even turn foe into friend—?#abhinandan pic.twitter.com/vVRaC6ZTyf
— Rauf Klasra (@KlasraRauf) March 12, 2019
विशेष म्हणजे यापुर्वीही पाकिस्तानाच्याच एका चहाच्या जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात देखील अभिनंदन यांना चहाचे घोट घेत “टी इज फंटास्टीक, थँक यु” म्हणताना दाखवले होते. नंतर ती जाहिरात खोटी असल्याचे उघड झाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.