आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीचा माहोल सुरु आहे. त्यामुळे सध्या सर्व पक्षातर्फे सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरु आहे पण सोशल मीडियावर प्रचारासोबत काही निगेटिव्ह आणि पॉजिटीव्ह गोष्टी चा प्रसार हि सुरु आहे. काही पक्ष मुद्दाम खोटे आकडे एडिट करून तसे फोटो वायरल केल्या जातात. असाच एक फोटो सध्या वायरल झाला आहे. त्या बद्दल चे फॅक्ट चेक आम्ही केले आहेत.
सोशल मीडियावर एबीपी न्यूज या वाहिनीच्या टीव्ही स्क्रीन चा फोटो सर्वत्र वायरल होतो आहे. त्या फोटोवर सी वोटर आणि एबीपी न्यूज यांनी केलेल्या सर्वेचे आकडे दिले आहेत. एनडीए ला ५६४ जागा दाखवण्यात आल्या तर एकूण जागा ५४३ आहेत हे पण त्यात आहे तसेच युपीए ला १४१ जागा तर इतर पक्षाला १३८ जागा दाखवल्या आहेत. त्या बाबत आम्ही अधिक माहिती घेतल्यानंतर हा एबीपी माझा चा स्क्रीन चा फोटो खरा आहे हे आढळून आले आहे.
एबीपी न्यूज या हिंदी वाहिनीवर देश का मूड या प्रोग्रॅम चा लाईव्ह एपिसोड आम्ही युट्युब वर पाहिला त्या एपिसोड मध्ये ४ तास २२ मिनिटा ५० सेकंदावर वरील प्रकारची ग्राफिक्स वाहिनीने दाखवली आहेत. हे ग्राफिक्स प्रचंड वायरल होऊन या वृत्तवाहिनीला ट्रॉल करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना हा ग्राफिक्स खोटा आहे असे वाटत होते.त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम होते. पण वहिनींकडून आकड्या बाबत चुकी झाल्याचे निदर्शित होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.
हे हि वाचा- अनेक दिवस जेलमध्ये राहुन बाहेर आल्यावर राजपाल यादवने सांगितले तेथील हे अनुभव..
हे हि वाचा- बाहुबली मधील शिवगामी देवी या सिनेमात करतेय पॉर्न स्टारची भूमिका..