बाहुबली सिनेमात शिवगामी देवीची भूमिका सर्वांच्या खूपच पसंतीस उतरली होती. अभिनेत्री राम्या कृष्णनन ने हि भूमिका साकारली होती. बाहुबलीची आई हे पात्र राम्याने केले होते. चाहत्यांचा त्यांचा अंदाज प्रचंड आवडला होता. राम्या कृष्णन आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या अपकमिंग सिनेमात ती चक्क एका पॉर्न स्टारची भूमिका साकारणार आहे.
या सिनेमाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला असून हा तो युट्युबवर धमाल करत आहे. राम्या कृष्णन ला या रोलविषयी विचारले असते तिने सांगितले कि काही भूमिका या पैश्यांसाठी असतात, काही भूमिका या प्रसिद्धी साठी असतात पण काही भूमिका या पॅशन म्हणून केल्या जातात.
राम्या कृष्णन हि सुपर डिलक्स या सिनेमातून दिसणार आहे. या सिनेमात अनेक गोष्टी बघायला मिळणार आहेत. ज्यामध्ये मल्लू अनकट या कहाणीमध्ये राम्या पॉर्न स्टारची भूमिका साकारणार आहे. राम्याने या सिनेमात एका सीनसाठी तब्बल ३७ वेळा रिटेक करण्यात आले होते. या गोष्टीची खूप चर्चा झाली होती. या सिनेमात राम्याशिवाय समांथा रुथ प्रभु, विजय सेथुपति, फहाद फासिल यांच्या भूमिका आहेत.
सुपर डिलक्स हा सिनेमा तामिळ भाषेत येणार आहे. हा सिनेमा साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक त्यागराजन कुमारराज यांनी दिग्दर्शित केला आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर राम्याचे भूमिकांमुळे या सिनेमाची खूप चर्चा सुरु आहे. लोकांना ट्रेलर तर प्रचंड आवडला असून सोशल मीडियावर या सिनेमाची जबरदस्त क्रेज दिसून येत आहे.
बघा सुपर डिलक्सचा तामिळ ट्रेलर-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.
हे हि वाचा- सासूच्या विरहात सुनेने आत्महत्या केलेल्या घटनेचे धक्कादायक वास्तव आले समोर..
हे हि वाचा- २०१४ च्या मोदींच्या विजयात महत्वाची भूमिका असलेल्या प्रशांत किशोर यांनी का सोडली मोदींची साथ