‘स्वराज रक्षक संभाजी’मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी नुकतेच काही शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अमोल कोल्हे हे आपल्या शिवकालीन भूमिकांमुळे घराघरात पोहचलेले आहेत. त्यांनी पूर्वी केलेल्या राजा शिवछत्रपती मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि आताची संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
‘स्वराज रक्षक संभाजी’हि मालिका सध्या टीआरपीच्या बाबतीत खूप पुढे आहे. महाराष्ट्रातील घराघरात हि मालिका सहकुटुंब बघितली जाते. पण मागील २-४ दिवसांपासून डॉ अमोल कोल्हे हे पूर्ण वेळ राजकारणात देण्यासाठी ‘स्वराज रक्षक संभाजी’ मालिका हि अर्धवट सोडणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियातून आणि विविध माध्यमातून याविषयी बातमी आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी होती.
अमोल कोल्हे हे खरंच मालिका सोडणार का असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण याविषयी अमोल कोल्हे यांनी स्वतः खुलासा केला आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून याविषयी खुलासा केला आहे. त्यांनी खुलासा केला आहे कि मालिका सोडण्याच्या सर्व बातम्या या अफवा आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, मी ‘स्वराज रक्षक संभाजी’ मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचार करत नसल्याचं कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.
मालिका पूर्ण केल्यानंतरच राजकीय क्षेत्रासाठी मालिका क्षेत्राला रामराम करणार असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या चाहत्यांना हा एक सुखद धक्का आहे. बघूया काय लिहिलंय अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये-
“नमस्कार! आता News Channel वरून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरत आहेत त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या बातमीवर विश्वास ठेवू नका हि नम्र विनंती. मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील! धन्यवाद!”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.