सध्या सर्वत्र #bycottSurfExcel या हॅशटॅगची चर्चा सुरु आहे. SurfExcel चा जोरदार निषेध करून ते वापरू नका असे आवाहन समाजात केले जात. #bycottSurfExcel हा ट्रेंड देखील नेटिझन्स ट्विटरवर चालवत आहेत. पण अनेकांना यामागचे कारणंच माहिती नाहीये. याला कारणीभूत ठरलीये Surf Excel ची नवीन जाहिरात.
होळीला थोडेच दिवस राहिलेत. बाजारपेठेत होळीची पूर्ण तयारी झालीय. टीव्हीवर होळीशी संबंधित जाहिराती सुरू झाल्यात. पण सध्या सर्फ एक्सेलच्या या नवीन जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू झाला आहे. या जाहिरातीचा उद्देश तास चांगला दाखवण्यात आला आहे. पण या जाहिरातीचा तीव्र विरोध होत आहे.
२७ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या या जाहिरातीत एका छोट्या हिंदू मुलीची आणि मुस्लिम मुलाची गोष्ट दाखवण्यात आली आहे जी हिंदू-मुस्लिम एकोप्याचा संदेश देतेय.
काय आहे जाहिरातीत-
एक मिनिटाच्या या जाहिरातीत बच्चेकंपनी होळी खेळताना दाखवली आहे. त्यात शुभ्र पांढऱ्या टी शर्टमध्ये एक हिंदू मुलगी एका गल्लीत सायकलवरून जातेय. घराच्या गॅलेरीत उभी असलेली बच्चेकंपनी तिच्या अंगावर रंग टाकून सगळे रंग संपवते.
रंग संपल्यानंतर ती आपल्या मुस्लिम मित्राच्या घरी जाते. बाहेरून त्याला हाक मारते आणि म्हणते बाहेर ये, सर्व संपलंय. तो छोटा मुलगा पांढऱ्या कुर्ता-पायजमा आणि नमाजची टोपी घालून बाहेर येतो. त्याला सायकलच्या मागे बसवून ती त्याला मशिदीच्या दरवाजाकडे सोडते. जिने चढता चढता तो मागे वळून म्हणतो, येतो मी. नंतर ती म्हणते, रंग उडवतील तुझ्यावर.त्यावर तो मंद स्मित देतो.
बघा जाहिरात-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.